• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेच्या सराफ कट्टा परिसरातील चौधरीला अटक, सांगलीतून एकजण ताब्यात : १ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त

Admin by Admin
May 30, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेच्या सराफ कट्टा परिसरातील चौधरीला अटक, सांगलीतून एकजण ताब्यात : १ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
ADVT.

विशेष प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली आणि मिरजेत नामांकित कंपनीच्या नावाने बनावट सिगारेटचा साठा करून विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कंपनीच्या अधिकाऱ्यांसह छापे मारून १ लाख ६० हजाराचा सिगारेट साठा जप्त केला.

याप्रकरणी बिरमा करमचंद गिडवाणी (वय ५०, रा. क्रांती हॉस्पिटलमागे, सांगली) व मुजाहिद मेहबूब चौधरी (वय ३८, रा. पटेल एम्पायर, रेवणी गल्ली, मिरज) या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

बिरमा गिडवाणी यांचे गणपती पेठेत गजानन स्टोअर्स नावाने दुकान आहे. या दुकानात नामांकित कंपनीच्या बनावट सिगारेटचा साठा करून विक्री होत असल्याची माहिती कंपनीचे अधिकारी यशवंत गोसावी व श्रीकांत साखरे यांना मिळाली. गोसावी व साखरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या मदतीने दुकानात छापा टाकला. यावेळी सिगारेटचा साठा आढळला. सिगारेटची पाकिटे ही कंपनीचे मूळ उत्पादन नसून बनावट असल्याचे निदर्शनास आले. उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने सिगारेटचा साठा पंचनामा करून जप्त केला. याप्रकरणी यशवंत गोसावी यांनी गिडवाणीविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

ADVT.

दरम्यान, मिरजेतील सराफ कट्टा येथे मुजाहिद चौधरी याच्या चौधरी ट्रेडर्स या दुकानात देखील नामांकित कंपनीची बनावट सिगारेटची विक्री होत असल्याची माहिती कंपनीचे अधिकारी अमोल बहुलेकर यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या मदतीने दुकानात छापा टाकला. याठिकाणी देखील बनावट सिगारेटचा साठा आढळला. सिगारेटची पाकिटे कंपनीची अधिकृत नसून पाकिटावरील युनिक आयडी एकच असून तो देखील ‘फेक’ असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सिगारेटचा साठा जप्त केला. कंपनीचे अधिकारी बहुलेकर यांनी चौधरीविरूद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सांगली व मिरजेतील छाप्यात नामांकित कंपनीचे ८०३ नग जप्त करण्यात आले. त्याची किंमत १ लाख ६० हजार ३१० रूपये इतकी आहे.

गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी बाबासाहेब माने, बसवराज शिरगुप्पी, अमोल ऐदाळे, इम्रान मुल्ला, अतुल माने, सागर टिंगरे, अनिल कोळेकर, दरिबा बंडगर, सुशिल मस्के, श्रीधर बागडी, विनायक सुतार, सुमित सूर्यवंशी, ऋतुराज होळकर, सोमनाथ पतंगे यांच्या पथकाने कारवाई केली.

कॉपीराईट ॲक्टनुसार गुन्हा

बिरमा गिडवाणीविरूद्ध बीएनएस ३४६, ३४७ (१), व्यापार चिन्ह अधिनियम आणि कॉपीराईट ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. तर चौधरीविरूद्ध देखील कॉपीराईट ॲक्ट १९५७ च्या कलम ५१, ५१ (बी), ६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

मिरज ब्रेकिंग | वृद्ध दाम्पत्यास मारहाण करून लुटले

Next Post

रांजणीत काठ्या-कुर्‍हाडीने मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
रांजणीत काठ्या-कुर्‍हाडीने मारहाणीत तरुणाचा मृत्यू

रांजणीत काठ्या-कुर्‍हाडीने मारहाणीत तरुणाचा मृत्यू

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group