• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज ब्रेकिंग | वृद्ध दाम्पत्यास मारहाण करून लुटले

Admin by Admin
May 30, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मिरज ब्रेकिंग | वृद्ध दाम्पत्यास मारहाण करून लुटले
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
ADVT.

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरजेतील बोलवाड रोडवरील हनुमाननगरमध्ये तीन चोरट्यांनी घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून जबरी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोकड असा चार लाखाचा मुद्देमाल लंपास केला.चोरट्यांच्या हल्ल्यात वृद्ध दाम्पत्य जखमी झाले. या घटनेने मिरज शहरात खळबळ उडाली आहे.

बाळासाहेब महादेव लांडगे (वय ६५) व पत्नी लक्ष्मी लांडगे अशी जखमींची नावे आहेत. बोलवाड रस्त्यावर हनुमाननगरमध्ये फिर्यादी लांडगे यांचे पत्रावजा घर आहे. तिथे ते, पत्नी लक्ष्मी, मुलगा व सून राहतात. गुरुवारी मध्यरात्री तीन चोरट्यानी दरवाजा तोडून घरात प्रवेश करून घरातील बाळासाहेब लांडगे यांना जबर मारहाण केली. तिघांनी हातात धारदार हत्यार घेऊन धाक दाखवित दमदाटी केली. तोंड दाबून लक्ष्मी यांच्या कानातील दीड तोळे वजनाची सोन्याची फुले हिसकावली.

गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र, हातातील अर्ध्या तोळ्याची अंगठी मोबाईल तसेच ऊस लागवडीसाठी ठेवलेले रोख ५० हजार, दुधाचे आलेले बिल रोख ५ हजार ५०० रुपये, लाडकी बहीण योजनेचे ६ हजार आणि अन्य १० ते १५ हजारांची रोकड, असे ९० हजार रुपये रोख लंपास केले. चोरट्यानी एकूण ४ लाख रुपयांचा ऐवज लुटला.

लक्ष्मी यांच्या कानाला जबर दुखापत झाली. यावेळी बाळासाहेब यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना मारहाण करीत चोरट्यांनी काढता पाय घेतला. यावेळी घरात त्यांची सून होती. पण ती बाजूच्या खोलीत झोपली होती, तर वाहनचालक असलेला मुलगा बाहेरगावी गेला होता.

घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी बाळासाहेब व लक्ष्मी यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे व त्यांच्या पथकानेही भेट दिली. या घटनेची नोंद मिरज शहर पोलिसांत झाली असून चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

Previous Post

ग्रामसभेत प्रश्न विचारला म्हणून एकाला बेदम मारहाण

Next Post

मिरजेच्या सराफ कट्टा परिसरातील चौधरीला अटक, सांगलीतून एकजण ताब्यात : १ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेच्या सराफ कट्टा परिसरातील चौधरीला अटक, सांगलीतून एकजण ताब्यात : १ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त

मिरजेच्या सराफ कट्टा परिसरातील चौधरीला अटक, सांगलीतून एकजण ताब्यात : १ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group