• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक, अव्वल कारकूनही अडकला ACB च्या जाळ्यात

Admin by Admin
May 27, 2025
in क्राईम
1 min read
0
ब्रेकिंग | निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक, अव्वल कारकूनही अडकला ACB च्या जाळ्यात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत निवासी उपजिल्हाधिकारी (RDC) विनोद खिरोळकर यांना ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे.

शेतजमिनीच्या वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडून २३ लाख रुपये आधीच घेतले होते. त्यानंतर पुन्हा १८ लाखांची मागणी केली होती, त्यापैकी ५ लाख घेताना त्यांना अव्वल कारकून त्रिभुवन यांच्यामार्फत पकडण्यात आले.

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत सरकारी अधिकाऱ्यांकडून लाच घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. ग्रामसेवकांपासून ते तहसीलदारांपर्यंत अनेकांना ACB ने कारवाई करत ताब्यात घेतले आहे. अलीकडेच परभणी येथे एका महिला क्रीडा अधिकाऱ्यालाही लाच घेताना अटक झाली होती. आता छत्रपती संभाजीनगरमधील या प्रकरणाने पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी शेतजमिनीच्या वर्ग बदलासाठी तक्रारदाराकडून मोठ्या रकमेची मागणी केली होती. यापूर्वी २३ लाख रुपये घेतल्यानंतरही त्यांनी १८ लाखांची अतिरिक्त मागणी केली. यातील ५ लाख रुपये घेताना ACB ने सापळा रचून त्यांना आणि अव्वल कारकून त्रिभुवन यांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | भाजपने केली दाेन आमदारांची पक्षातून हकालपट्टी

Next Post

ब्रेकींग | मंत्रालयात पाणी शिरले, कर्मचाऱ्यांची तारांबळ; शासकीय वाहने बुडाली पाण्यात

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकींग | मंत्रालयात पाणी शिरले, कर्मचाऱ्यांची तारांबळ; शासकीय वाहने बुडाली पाण्यात

ब्रेकींग | मंत्रालयात पाणी शिरले, कर्मचाऱ्यांची तारांबळ; शासकीय वाहने बुडाली पाण्यात

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group