• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकींग | मिरजेत वाहन चोरीचा अजब प्रकार, चोरटयांनी गाडीचे पार्ट काढलं अन सांगाडा लावला रस्त्यावर, घटना CCTV मध्ये कैद

Admin by Admin
May 27, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
ब्रेकींग | मिरजेत वाहन चोरीचा अजब प्रकार, चोरटयांनी गाडीचे पार्ट काढलं अन सांगाडा लावला रस्त्यावर, घटना CCTV मध्ये कैद
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरजेत वाहन चोरीचा अजब प्रकार समोर आला आहे. दोन दिवसापूर्वी चोरीला गेलेले मोपेड वाहन चोरट्याने त्याचे पार्ट काढून सांगाडा रात्री रस्त्यावर लावून चोरटा पसार झाला आहे. हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

मिरजेच्या वखार भाग माळी स्मशानभूमी जवळ प्रमिला यादव यांची मोपेड वाहन दोन दिवसांपूर्वी चोरीला गेले होते. या चोरीची(Theft) तक्रार मिरज शहर पोलिसात तक्रार देऊन वाहनाचा शोध सुरू होता. मात्र, आज सकाळी हे वाहन वेताळ नगर येथे रस्त्यावर लावून चोरटा पसार झाला आहे.

या वाहनाचे पार्ट काढून घेऊन वाहनाचा सांगाडा रस्त्यावर लावण्यात आला होता. या चोरीचा अजब प्रकारामुळे परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वाहन चोरून नेत असताना चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. पहाटे वाहन घेऊन चोरटा चालत जात असताना दिसून आला. पोलिसांनी वाहनाचा सांगाडा जप्त केला असून मिरज शहर पोलीस चोरट्याचा शोध घेत आहे.

घडलेल्या या प्रकारात चोरट्याने नेमके असे का केले आणि कशासाठी केले ते अद्याप कळालेले नाही. हा व्हिडिओ(Video) सध्या इन्स्टाग्रामवरील saamtvnews या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. ऐवढेच नाही तर सर्व प्रकार पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक संतापजनक आणि मजेशीर प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

https://www.instagram.com/reel/DKJUg28Iddp/?igsh=YzljYTk1ODg3Zg==

टीप: हा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Previous Post

मोठी बातमी | संभाजीनगरमध्ये अमोल खोतकरचा एन्काऊंटर, पोलिसांच्या अंगावर गाडी घालून…

Next Post

मोठी ब्रेकिंग | भाजपने केली दाेन आमदारांची पक्षातून हकालपट्टी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | भाजपने केली दाेन आमदारांची पक्षातून हकालपट्टी

मोठी ब्रेकिंग | भाजपने केली दाेन आमदारांची पक्षातून हकालपट्टी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group