• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी | संभाजीनगरमध्ये अमोल खोतकरचा एन्काऊंटर, पोलिसांच्या अंगावर गाडी घालून…

Admin by Admin
May 27, 2025
in क्राईम
1 min read
0
मोठी बातमी | संभाजीनगरमध्ये अमोल खोतकरचा एन्काऊंटर, पोलिसांच्या अंगावर गाडी घालून…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक लड्डा यांच्या घरावरीला दरोडा प्रकरणी मुख्य आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला. रात्री वडगाव कोल्हाटी परिसरामध्ये पोलीस आणि आरोपींमध्ये चकमक झाल्यानंतर एन्काऊंटर केल्याची माहिती मिळाली.

सोमवारी रात्री आरोपी अमोल खोतकर पकडण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पोलिसांनाच मारण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांनी एन्काऊंटर केला. दरम्यान, दोन आठवड्यापूर्वी छत्रपती संभाजी नगर शहरातील वाळूज परिसरामध्ये उद्योजक लड्डा यांच्या घरावर मोठा दरोडा टाकण्यात आला जवळपास साडेसहा किलो सोनं चांदी आणि रोख रक्कम लुटली होती.

बीड अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल खोतकर याचं पोलिसांनी मध्यरात्री एन्काऊंटर केलं. साडेबारा-एकच्या सुमारास खोतकरने पोलिसांवर गाडी घालून गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी त्याचं एन्काऊंटर केलं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, पोलिसांकडून अधिक माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचं समजतंय.

छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर पडलेला सुमारे ६ कोटींच्या दरोड्याचा उलगडा झाला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने त्यातील पाच जणांना ताब्यात घेतले होते.मात्र, दरोड्याचा मुख्य सूत्रधार पसार होता. त्याला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांनी प्रचंड गुप्तता बाळगली होती. काल रात्री या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांना सापडल्यानंतर तो पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून पळून जात होता अशा वेळेस एन्काऊंटर केले असल्याची माहिती आहे.

उद्योजक लड्डा हे मुलाच्या पदवी प्रदान समारंभासाठी ७ मे रोजी कुटुंबीयांसह अमेरिकेला गेले होते. १९ वर्षांपासूनचा विश्वासू कामगार संजय झळके (रा. वळदगाव) याला केअरटेकर म्हणून बंगल्यावर ठेवले होते. १५ मे रोजी पहाटे २ ते ४ यादरम्यान ६ दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाकावर बंगल्यातून साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदी असा सुमारे ६ कोटी रुपयांचा ऐवज लुटला होता. एवढ्या मोठ्या दरोड्याची राज्यभर चर्चा होती. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यावर तपास गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्याकडे वर्ग केला होता. ११ दिवसांपासून गुन्हे शाखेचे ७ आणि एमआयडीसी वाळूज ठाण्यातील २ अशी ९ पथके तपास करीत होती.

Previous Post

दगडाने ठेचून तरुणाची हत्या, शिरोळ तालुक्यातील घटना

Next Post

ब्रेकींग | मिरजेत वाहन चोरीचा अजब प्रकार, चोरटयांनी गाडीचे पार्ट काढलं अन सांगाडा लावला रस्त्यावर, घटना CCTV मध्ये कैद

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकींग | मिरजेत वाहन चोरीचा अजब प्रकार, चोरटयांनी गाडीचे पार्ट काढलं अन सांगाडा लावला रस्त्यावर, घटना CCTV मध्ये कैद

ब्रेकींग | मिरजेत वाहन चोरीचा अजब प्रकार, चोरटयांनी गाडीचे पार्ट काढलं अन सांगाडा लावला रस्त्यावर, घटना CCTV मध्ये कैद

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group