• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुपवाडात झालेला खून सराईत गुन्हेगाराचा..!

Admin by Admin
May 27, 2025
in क्राईम
1 min read
0
कुपवाडात झालेला खून सराईत गुन्हेगाराचा..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सराईत गुन्हेगार श्रावणेशनाथ महावीर चौगुले (वय 29, सध्या रा. सिद्धिविनायक पार्क, शिवशक्तीनगर कुपवाड, मूळ गाव भोसे, ता. मिरज) याचा रविवारी रात्री मिरज एमआयडीसीलगत असलेल्या शिवशक्ती नगरमधील भाड्याच्या खोलीत त्याच्या दोन मित्रांनी खून केला.तशी तक्रार त्याच्या नातेवाईकांनी कुपवाड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

पोलिसांनी संशयित दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोफ्या व अशोक मोरे (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांची पथके संशयितांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भोसे (ता. मिरज) येथील श्रावणेशनाथ हा आठ महिन्यांपासून मिरज एमआयडीसीलगत असलेल्या शिवशक्तीनगरमधील सचिन माने यांच्या खोलीत भाड्याने एकटाच राहात होता. त्याच्या दोन मित्रांनी रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात कारणावरून त्याच्या छातीवर, डोक्याच्या पाठीमागे धारदार शस्त्राने वार करून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संशयितांच्या शोधासाठी कुपवाड पोलिस व सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस, अशी दोन पथके रवाना झाली आहेत.

Previous Post

ग्रामपंचायत मधील सत्ताधाऱ्यांना आश्वासनांचा विसर ; संजय महाडीक

Next Post

ब्रेकिंग | मिरजेतील डॉक्टरला अटक : परिचारिकेवर बलात्कार, सर्वत्र जोरदार चर्चा..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | मिरजेतील डॉक्टरला अटक : परिचारिकेवर बलात्कार, सर्वत्र जोरदार चर्चा..!

ब्रेकिंग | मिरजेतील डॉक्टरला अटक : परिचारिकेवर बलात्कार, सर्वत्र जोरदार चर्चा..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group