• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | पुणे-बंगळुरू महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स उलटली, चार प्रवासी जखमी

Admin by Admin
May 26, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | पुणे-बंगळुरू महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स उलटली, चार प्रवासी जखमी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

पुणे-बंगळुरू महामार्गावर अंबप फाटा (ता. हातकणंगले) येथे खासगी ट्रॅव्हल्स उलटून झालेल्या अपघातात चार प्रवासी जखमी झाले. जगदीश पुजारी (वय ४२), उषा पुजारी (३३, सध्या दोघे रा.बिबेवाडी, पुणे, मूळ रा. केरळ) आणि रतन जयराम अनशन (४०, रा. लोअर परळ, मुंबई) अशी जखमींची नावे आहेत. यासह एक मुलगाही जखमी झाला. हा अपघात सोमवारी (दि. २६) सकाळी सातच्या सुमारास घडला. खासगी बस बंगळुरूहून पुण्याकडे निघाली होती.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची बस बंगळुरूहून पुण्याकडे निघाली होती. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास अंबप फाटा येथे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस उलटली. काही अंतर घसरत गेलेली बस मातीच्या ढिगा-याजवळ जाऊन थांबली. या अपघातात बसमधील चार प्रवासी जखमी झाले.

जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. अपघातावेळी बसची गती कमी असल्याने जीवितहानी टळली. तीन दिवसांपूर्वीच या परिसरात मेनन पिस्टन कंपनीजवळ खासगी ट्रॅव्हल्सने ट्रकला धडक दिली होती. त्या अपघातात एक ठार, तर १६ प्रवासी जखमी झाले होते. महामार्ग रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे.

Previous Post

पूर्व भागातील पदाधिकारी महिलेकडून नवऱ्याची व त्याच्या रखेलीची यथेच्छ धुलाई ?

Next Post

मोठी बातमी | स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर सांगलीत भाजप युवा नेत्याची मोठी मागणी? ‘हिंदू, धनगर, ओबीसांची मते हवी असल्यास पडळकरांना…’

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर सांगलीत भाजप युवा नेत्याची मोठी मागणी? ‘हिंदू, धनगर, ओबीसांची मते हवी असल्यास पडळकरांना…’

मोठी बातमी | स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर सांगलीत भाजप युवा नेत्याची मोठी मागणी? 'हिंदू, धनगर, ओबीसांची मते हवी असल्यास पडळकरांना...'

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group