• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी | स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर सांगलीत भाजप युवा नेत्याची मोठी मागणी? ‘हिंदू, धनगर, ओबीसांची मते हवी असल्यास पडळकरांना…’

Admin by Admin
May 26, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय
1 min read
0
मोठी बातमी | स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर सांगलीत भाजप युवा नेत्याची मोठी मागणी? ‘हिंदू, धनगर, ओबीसांची मते हवी असल्यास पडळकरांना…’
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

आगामी स्थानिकसाठी जिल्ह्यातील सर्वच नेते आणि पक्ष तयारीला लागले असून सांगलीत मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केलेल्या मागणीमुळे येथील राजकीय वातावरण तापलेलं आहे. आगामी स्थानिकची निवडणूक ऑक्टोंबर 2025मध्ये होण्याची शक्यता आहे.

अशावेळी भाजपची मुलुखमैदान तोफ, फायरब्रँड नेते गोपिचंद पडळकर यांना मंत्रीपद मिळावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ही मागणी स्थानिक भाजप नेत्यांकडून आता होताना दिसत असून या मागणीला जोर वाढला आहे. सध्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात स्थानिकच्या तयारीला भाजप लागली आहे. पण आता या मागणीमुळे चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केला जातोय.

सांगली जिल्हा भाजप उद्योग आघाडीचे अध्यक्ष तथा युवा नेते संजयआण्णा तेली यांनी आगामी स्थानिकच्या तोंडावर ही मागणी केली आहे. तेली यांच्या मागणीनुसार सध्या पडळकर यांना ताकद देणं गरजेचं असून ती काळाची गरज आहे. तसेच पडळकर हे हिंदू समाजापासून धनगर आणि ओबीसी समाजातील लोकप्रिय नेते असल्याचेही संजयआण्णा तेली यांनी म्हटलं आहे. पडळकर यांनी याआधी देखील विधानसभेबरोबरच सभागृहाबाहेर हिंदू, धनगर आणि ओबीसी समाजातील प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यांच्याबद्दल समाजात आपुलकी असून एक विश्वास देखील आहे. यामुळे पडळकरांना मंत्रिपदाची संधी मिळालया हवी.

राज्यात धनगर समाज महत्वाचा असून निवडणुकीत निर्णायक मतदार ठरला आहे. यामुळेच सांगली जिल्ह्यात भाजपचे चार आमदार निवडणूक आले आहेत. जिल्ह्यास धनगर समाजाची संख्या लक्षणीय असून राज्यातही ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या समाजाला पडळकर यांनी एकत्र बांधण्याचे काम केलं आहे. ज्यापद्धतीने धनगर समाज मोठा आहे तसाच ओबीसी समाजही मोठा असून पडळकर यांनी वेळोवेळी समाजाच्या हितासाठी काम केलं आहे. यामुळेच पडळकर यांची मंत्रिपदी वर्णी लागणे गरजेचे आहे. तसे झाल्यास ही बाब महायुतीच्या राजकीय वाढीसाठी फायदेशीर ठरणार असल्याचा दावा देखील संजयआण्णा तेली यांनी केला आहे.

यावेळी संजयआण्णा तेली यांनी, आगामी स्थानिक निवडणुकींचे महत्व महायुतीसाठी महत्वाचे आहे. गेल्या काही वर्षात सांगलीत भाजपची ताकद वाढली असून मागच्या वेळी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये यश मिळवले होते. अशा स्थितीत पडळक यांना मंत्रिपद दिल्यास सांगलीत भाजपसह महायुतीची सत्ता येण्यास अडचण येणार नाही.

पडळक प्रभावी नेतृत्व

संजयआण्णा तेली यांनी, पडळकरांसाठी मंत्रिपदाची मागणी करताना, पडळकर हे प्रभावी व्यक्तिमत्व असून ते ज्वलंत प्रश्न माडणारे आहेत. जनतेचं काम करणारं नेतृत्व आहे. पडळकर हिंदू समाजाच्या हितासाठी काम करणारेही नेतृत्व असल्याने ते मंत्रिमंडळात असणे काळाची गरज आहे. शिवाय धनगर आणि ओबीसी समाजात देखील त्यांची मोठी क्रेझ असून याचा फायदा आगामी स्थानिकमध्ये होऊ शकतो. त्यांच्यामुळे अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्ता मिळवण्यात येऊ शकते असेही संजयआण्णा तेली यांचे मत आहे.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | पुणे-बंगळुरू महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स उलटली, चार प्रवासी जखमी

Next Post

ब्रेकिंग | महाराष्ट्रातील बड्या मंत्र्याच्या मुलावर शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीत पुन्हा मोठा राजकीय भूकंप..! थेट जिल्हाप्रमुखासह शेकडोजण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत..! आज होणार पक्षप्रवेश,वाचा सविस्तर..

ब्रेकिंग | महाराष्ट्रातील बड्या मंत्र्याच्या मुलावर शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group