• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शासकीय नोकरी देण्याचे आमिष दिले अन्.; इचलकरंजीतील धक्कादायक घटना

Admin by Admin
May 25, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
शासकीय नोकरी देण्याचे आमिष दिले अन्.; इचलकरंजीतील धक्कादायक घटना
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मुंबईच्या म्हाडा गृहनिर्माण विभागात शासकीय नोकरी देण्याचे आमिष दाखवून तब्बल ३३ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माजी मंत्री व विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व त्यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांचे नाव वापरून विश्वास संपादन करत ही फसवणूक केल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे.

शिरोळ तालुक्यातील लाट येथील चैतन्य शिक्षण संस्थेचे दशरथ गणपती काळे आणि शरद गणपती काळे (रा. अब्दुललाट) या दोघां बंधूनी विशाल शांतिनाथ मंडपे व दीपिका विशाल मंडपे (रा. शिरोळ) या पती-पत्नींकडून ही रक्कम उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मंडपे दाम्पत्याने इचलकरंजीच्या अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.

फसवणूकीची घटना कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांच्या हालचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शनिवारी पीडित मंडपे दाम्पत्याने पोलीस ठाण्याशी संपर्क साधून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. म्हाडामध्ये अधिकाऱ्याची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ९ डिसेंबर २०२५ रोजी दशरथ काळे याच्या खात्यात ५ लाख आणि शरद काळे याच्या खात्यात ५ लाख रुपये आरटीजीएसद्वारे, तर उर्वरित २३ लाख रुपये रोख स्वरूपात दिल्याची माहिती तक्रारीत नमूद केली आहे.

पीडितांनी रकमेबाबत वारंवार मागणी करूनही पैसे परत मिळाले नाहीत, उलट दशरथ काळे याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची व खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत नमूद आहे. आमची पोलीस स्टेशनमध्ये आणि यड्रावकर साहेबांशी ओळख आहे. तुला खोट्या प्रकरणात अडकवेन आणि रात्रीतून मारून टाकीन, अशी धमकी दिल्याचे मंडपे यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात दशरथ व शरद काळे यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, तसेच माझ्या व कुटुंबाच्या जिविताचे रक्षण करावे, अशी मागणी मंडपे दाम्पत्याने केली आहे. अन्यथा मी कलेक्टर कार्यालय, कोल्हापूर येथे आत्मदहन करणार आहे, असा इशारा तक्रारीत देण्यात आला आहे. तक्रारीच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व कुरुंदवाड पोलिस निरीक्षक यांना पाठवण्यात आल्या आहेत.

Previous Post

ब्रेकिंग | सीपीआरमधून पळालेल्या आरोपीला मिरजेत बेड्या

Next Post

ब्रेकिंग | महावितरण ‘हाय अलर्ट’वर ;अधिकाऱ्यांनी मुख्यालय न सोडण्याचा आदेश

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | महावितरण ‘हाय अलर्ट’वर ;अधिकाऱ्यांनी मुख्यालय न सोडण्याचा आदेश

ब्रेकिंग | महावितरण 'हाय अलर्ट'वर ;अधिकाऱ्यांनी मुख्यालय न सोडण्याचा आदेश

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group