• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलिस मुख्यालयाचे २३ रोजी उद्घाटन

Admin by Admin
May 21, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलिस मुख्यालयाचे २३ रोजी उद्घाटन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगलीच्या वास्तू वैभवात भर घालणारी पोलिस मुख्यालयाची नवी इमारत पूर्ण होऊन दोन वर्षांचा कालावधी लोटला. नव्या इमारतीत पोलिस विभागाचे कामकाजही सुरू झाले. आता या इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला आहे.

शुक्रवार, दि. २३ रोजी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते नव्या इमारतीचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यासाठी पोलिस प्रशासनाकडून तयारी सुरू आहे.

विश्रामबाग परिसरात १९६७ साली पोलिस मुख्यालय उभारण्यात आले. दगडी बांधकाम असलेल्या या इमारतीत सुमारे ५५ वर्षे पोलिस प्रशासनाचे कामकाज सुरू होते. पोलिस दलाचा विस्तार झाल्याने नवीन इमारतीची मागणी होत होती. त्यानुसार शासनाकडून नवीन इमारतीला मंजुरी मिळाली. ऑगस्ट २०२३ मध्ये नवीन मुख्यालयाचे काम पूर्ण झाले. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटन रखडले होते. सहा महिन्यांनंतर गृह विभागाची परवानगी घेऊन जुन्या इमारतीतील मुख्यालय नव्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात आले. त्यानंतरही अनेकदा मुख्यालयाच्या उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यात आली. पण मुख्यमंत्र्यांची वेळच मिळाली नाही. अखेर दोन वर्षांनंतर नव्या इमारतीचे उद्घाटन होत आहे.

२३ मे रोजी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मुख्यालयाचे उद्घाटन होणार आहे. त्यासाठी पोलिस दलाकडून तयारी सुरू आहे. मंगळवारी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजनाची बैठक घेत सूचना केल्या.

🛑 असे आहे मुख्यालय…

तीन मजली इमारत

प्रशस्त पार्किंगची व्यवस्था

५४ हजार चौरस फूट बांधकाम

इमारतीसमोर पोलिस स्मृती स्तंभ

🛑 या विभागांचे कामकाज…

पोलिस अधीक्षक, अप्पर अधीक्षक, गृह उपअधीक्षकांचे कक्ष, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, आर्थिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, सायबर विभाग, पोलिस कल्याण विभाग, पासपोर्ट विभाग, भरोसा सेल, महिला साहाय्यता कक्ष, कॉन्फरन्स हॉल.

Previous Post

सांगलीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल

Next Post

मिरज ब्रेकिंग | रिल्स ठेवल्यानेच निलजी- बामणीतील ‘त्या’ युवकाचा खून; दोघे अल्पवयीन ताब्यात

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज ब्रेकिंग | रिल्स ठेवल्यानेच निलजी- बामणीतील ‘त्या’ युवकाचा खून; दोघे अल्पवयीन ताब्यात

मिरज ब्रेकिंग | रिल्स ठेवल्यानेच निलजी- बामणीतील 'त्या' युवकाचा खून; दोघे अल्पवयीन ताब्यात

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group