• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

वन डिस्ट्रीक्ट-वन रजिस्ट्रेशन’ योजनेचा गैरफायदा, नोंदणी कार्यालयात बनावट नोंदण्यांचा सुळसुळाट

Admin by Admin
May 14, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
वन डिस्ट्रीक्ट-वन रजिस्ट्रेशन’ योजनेचा गैरफायदा, नोंदणी कार्यालयात बनावट नोंदण्यांचा सुळसुळाट
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

नोंदणी कार्यालयात बनावट दस्त नोंदणी करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी हे प्रकार सर्सासपणे होत आहेत. या गंभीर प्रकाराच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांना निवेदन देण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.संघटनेचे अध्यक्ष रोहन सुरवसे-पाटील यांनी या मागणीचे निवेदन दिले आहे.

सदर प्रकरणात काही व्यक्तींनी संगनमत करून खोटे दस्त तयार करून, बनावट व्यक्ती उभी करून दस्त नोंदणी केली आहे. अशाच पद्धतीचे बेकायदेशीर दस्त केवळ पुण्यातच नव्हे संपूर्ण राज्यात नोंदवले जात असल्याचे वारंवार समोर येत आहेत. अशा बेकायदेशीर प्रकारांमुळे सामान्य नागरिकांची आयुष्यभराची संपत्ती गमावण्याचा धोका निर्माण होतो. एकदा बोगस दस्त नोंदला गेल्यानंतर, मूळ मालकाला न्याय मिळविण्यासाठी वर्षानुवर्षे न्यायालयीन लढा द्यावा लागतो. यामुळे मानसिक, आर्थिक आणि सामाजिक त्रासास त्या व्यक्तीला सामोरे जावे लागते, असेही या निवेदनात म्हटले आहे. नोंदणी विभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी व अश्या बेकायदेशीर प्रकाराला आळा घालावा, ही आमची प्रमुख मागणी असल्याचे यावेळे सुरवसे-पाटील यांनी सांगितले.

‘वन डिस्ट्रीक्ट-वन रजिस्ट्रेशन’ योजनेचा गैरफायदा घेत काही व्यक्ती दुसऱ्या तालुक्यात जाऊन फसवणूक करत आहेत. म्हणजेच एका तालुक्यातील जमिनीचा दस्त दुसऱ्या तालुक्यात नोंदवला जातो आणि यामध्ये मूळ मालकाच्या नकळत खोटी विक्री केली जाते. सासवड येथील नोंदणी कार्यालयात बनावट व्यक्ती उभी करून नोंदणी केल्याचा प्रकारही नुकताच घडला असून त्याचे दस्त क्रमांकही असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Previous Post

खळबळ | मशिदींमध्ये बाहेरून येणाऱ्या धर्मगुरूंची चौकशी करा, पोलिसांना निवेदन : पाकिस्तानचा ध्वज जाळला..!

Next Post

मोठी ब्रेकिंग! अजित पवार गटातील आमदाराचा भीषण अपघात; ट्रक आणि कारची धडक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग! अजित पवार गटातील आमदाराचा भीषण अपघात; ट्रक आणि कारची धडक

मोठी ब्रेकिंग! अजित पवार गटातील आमदाराचा भीषण अपघात; ट्रक आणि कारची धडक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group