• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | भररस्त्यात शिवीगाळ, दमदाटी करत एसटी चालकाला पोलिसाने केली मारहाण;

Admin by Admin
May 14, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | भररस्त्यात शिवीगाळ, दमदाटी करत एसटी चालकाला पोलिसाने केली मारहाण;
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोडोली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

एसटी बसचालकास पोलिस व त्याच्या पत्नीने दमदाटी करत मारहाण केल्याप्रकरणी इचलकरंजी पोलिस ठाण्याचे (Ichalkaranji Police Station) पोलिस कर्मचारी आसिफ महम्मद कलायगार आणि त्यांची पत्नी हाफिबा आसिफ कलायगार यांच्याविरोधात कोडोली पोलिस ठाण्यात (Kodoli Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ही घटना रविवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास रत्नागिरी महामार्गावरील नावली (ता. पन्हाळा) येथे घडली आहे.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मलकापूर आगाराची एसटी बस (क्र. एमएच ११ – टी ९२८७) घेऊन बसचालक नितीन शिरगावकर हे कोल्हापूरहून मलकापूरकडे रविवारी दुपारी जात होते. यावेळी कलायगार हे पत्नीसह चारचाकी गाडीतून मलकापूरच्या दिशेनेच जात होते. वाघबीळ (ता. पन्हाळा) पासून एसटी बसचालक पुढे जाण्यासाठी प्रयत्न करीत होते. परंतु, त्यांना पुढे जाण्याची संधी कलायदार यांनी दिली नाही.

अखेर नावली येथे रस्ता रुंद असल्याने बसचालकाने बस पुढे घेऊन, साईड द्यायची नाही का, असे कलायदार यांना विचारले. यावेळी कलायदार दाम्पत्याने बसचालकास शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केली. हाणामारी दरम्यान कलायदारने बसचालकाला मी पोलिस खात्यात असून तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली.

कलायदार दाम्पत्य बसचालकावर मोठ्या प्रमाणावर अरेरावी करीत असल्याने स्थानिक नागरिक व प्रवाशांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. रविवारी याबाबत तक्रार दिली असता पोलिसांनी कलायदारच्या विरोधात केवळ एनसीआर दाखल केला होता. बस चालकाला ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने सोमवारी दुपारी कोडोली पोलिस ठाण्यात येऊन गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Previous Post

रवींद्र शिसवे गुप्तवार्ता विभागात; राज्यातील आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next Post

सांगली ब्रेकिंग | पुणे-मिरज मार्गावर शेतकर्‍यांचा रेल रोको

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | पुणे-मिरज मार्गावर शेतकर्‍यांचा रेल रोको

सांगली ब्रेकिंग | पुणे-मिरज मार्गावर शेतकर्‍यांचा रेल रोको

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group