• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

रवींद्र शिसवे गुप्तवार्ता विभागात; राज्यातील आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Admin by Admin
May 14, 2025
in क्राईम, मंत्रालय
1 min read
0
रवींद्र शिसवे गुप्तवार्ता विभागात; राज्यातील आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होताना दिसत आहे. आठवड्याभरापूर्वी सहा आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यानंतर आता राज्यातील आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी रवींद्र शिसवे यांची बदली राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे. तर शारदा निकम यांची बदली अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. (Eight senior IPS officers from Maharashtra including Ravindra Shisve and Sharda Nikam transferred)

रवींद्र शिसवे हे मुंबईतील लोहमार्ग पोलीस आयुक्तपदी कार्यरत होते. मात्र आता त्यांची बदली राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे. शारदा निकम यांची अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली. नागपूर शहराचे पोलीस सहआयुक्त निस्सार तांबोळी यांची बदली राज्य राखीव पोलीस दलाच्या महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. अमरावतीचे पोलीस आयुक्त एन डी रेड्डी यांची बदली नागपूर शहराच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे. याशिवाय सुप्रिया पाटील यादव, राजीव जैन, अभिषेक त्रिमुखे आणि आरती सिंह यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आरती सिंह यांच्याही बदलीचे आदेश जारी करण्यात आले असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहेत.

रविंद्र शिसवे – सहआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग

शारदा वसंत निकम –विशेष पोलीस महानिरीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स

निस्सार तांबोळी – विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस दल

एन डी रेड्डी – पोलीस सहआयुक्त, नागपूर

सुप्रिया पाटील-यादव – विशेष पोलीस महानिरीक्षक, आस्थापना

राजीव जैन – विशेष पोलीस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा

अभिषेक त्रिमुखे – विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशासन

आरती सिंह – पदस्थापनेचे आदेश बाकी

Previous Post

सांगली भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सम्राट महाडिक,शहर जिल्हाध्यक्षपदी प्रकाश ढंग

Next Post

ब्रेकिंग | भररस्त्यात शिवीगाळ, दमदाटी करत एसटी चालकाला पोलिसाने केली मारहाण;

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | भररस्त्यात शिवीगाळ, दमदाटी करत एसटी चालकाला पोलिसाने केली मारहाण;

ब्रेकिंग | भररस्त्यात शिवीगाळ, दमदाटी करत एसटी चालकाला पोलिसाने केली मारहाण;

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group