• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली : वाळव्यात कोयत्याने तिघांवर हल्ला..

Admin by Admin
May 11, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली : वाळव्यात कोयत्याने तिघांवर हल्ला..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

वाळवा : खबऱ्या प्रतिनिधी / येथे शेतात पाणी पाजण्याच्या कारणावरून कोयता, काठीने झालेल्या मारहाणीत तीनजण जखमी झाले. सम्मेद उदय नवले (वय 22), सिद्धार्थ उदय नवले (वय 20) व त्यांचे आजोबा भूपाल नवले (वय 70, सर्व रा.नेमिनाथनगर, वाळवा) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी सम्मेद नवले यांनी आष्टा पोलिसात फिर्याद दिली आहेत.

याप्रकरणी संशयित विशाल ऊर्फ हरी शशिकांत जाधव व शशिकांत वसंत जाधव यांना अटक केली आहे. दोघांना इस्लामपूर न्यायालयाने उभे केले असता दि. 13 मे अखेर पोलिस कोठडी दिली.

सोमवारी सकाळी वाळवा-पडवळवाडी रस्त्यालगत असणार्‍या शेतामध्ये सम्मेद व सिद्धार्थ हे शेतात पाणी पाजण्यास गेले होते. त्यावेळी विशाल व शशिकांत हे पिता-पुत्र त्या ठिकाणी आले. शेतात पाणी का पाजताय, असा जाब विचारत दोघांनी कोयता व काठीने सम्मेद व सिद्धार्थ यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये सम्मेद यांच्या डोक्यात, हातावर व पायावर वार झाले. सिद्धार्थ यांच्या हाताची दोन बोटे कापली गेली व कपाळावर कोयता मारण्यात आला. त्यांचे आजोबा भूपाल नवले यांनाही काठीने मारहाण करण्यात आली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

Previous Post

विधायक कार्यातून नेतृत्व विकसित करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

Maharashtra ZP Elections : झेडपीचीही रणधुमाळी सुरू, प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर, ‘ही ‘आहे अंतिम मुदत…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Maharashtra ZP Elections : झेडपीचीही रणधुमाळी सुरू, प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर, ‘ही ‘आहे अंतिम मुदत…

Maharashtra ZP Elections : झेडपीचीही रणधुमाळी सुरू, प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर, 'ही 'आहे अंतिम मुदत...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group