पाकिस्तानातील लाहोर शहरात आज सकाळी तीन बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमुळे लाहोरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून विमानतळ बंद करण्यात आले आहे.स्फोट होताच नागरिकांची पळापळ सुरु झाली.
लाहोर कॅन्टोन्मेंटकडे जाणाऱ्या वॉल्टन रोडवर ड्रोन हल्ल्यानंतर लाहोरमध्ये प्रचंड गोंधळ उडाला असून लोक घाबरून रस्त्यावर उतरले.
सकाळी हे बॉम्बस्फोट झाल्याने नागरिकांमध्ये एकच भीती पसरली. त्यामुळे लोक रस्त्यावर उतरले. हे स्फोट ड्रोन द्वारे करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली, पण हे हल्ले कोणी केले आहेत याबद्दल माहिती समोर आलेली नाही.

