• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“हम अल्लाह की कसम खाते है….”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अल कायदाची भारताला धमकी

Admin by Admin
May 8, 2025
in क्राईम, सामाजिक
1 min read
0
“हम अल्लाह की कसम खाते है….”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अल कायदाची भारताला धमकी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले आहेत. त्यानंतर अल कायदाच्या भारतीय उपमहाद्विप शाखेकडून निवेदन जारी करण्यात आले आहे.

पाकिस्तानवर झालेल्या हल्ल्याला यातून उत्तर दिले आहे. हे विधान अस-सहाब-मीडियाच्या माध्यमातून केले. अल कायदा संघटनेने भारताला धमकी देत या हल्ल्याचा बदला घेऊ असं म्हटलं आहे.

जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, ६ मे २०२५ च्या रात्री भारताच्या भगवा सरकारने पाकिस्तानातील ६ ठिकाणी हल्ले केले. विशेषत: मस्जिद, झोपड्यांना टार्गेट केले. त्यात अनेक मुसलमान शहीद आणि जखमी झालेत. आम्ही अल्लाहचे आहोत, त्याच्याकडे जाऊ. अल्लाह शहीदांना जन्नतमध्ये उंच स्थान देईल, जखमींना लवकर बरे करेल. आमीन..हा हल्ला भगवा सरकारच्या गुन्ह्याच्या यादीतील आणखी एक अध्याय आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच भारताचे इस्लाम आणि मुसलमान यांच्याविरोधातील युद्ध नवीन नाही. हे अनेक वर्षापासून सुरू आहे. भारत आणि काश्मीरच्या मुसलमानांवर खूप अत्याचार होत आहेत. मोदी सरकार सैन्य, राजनैतिक, सांस्कृतिक आणि मीडियातून इस्लाम, मुसलमानांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. मुसलमानांविरोधात भारताचा हा जिहाद आहे. आमचे कर्तव्य आहे अल्लाहचं नाव बुलंद करू. इस्लाम आणि मुसलमानांचे रक्षण करू. अन्याय झालेल्यांना मदत करू. आम्ही शपथ घेतो, अल्लाहच्या मदतीने आम्ही तोपर्यंत लढत राहू जोवर मुसलमानांवर झालेल्या प्रत्येक अत्याचारा बदला घेत नाही अशी धमकीही अल कायदाने भारताला दिली आहे.

भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला

दरम्यान, भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानी सैन्य तयार आहे, अशी दर्पोक्ती पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केली आहे. मंगळवारी रात्री झालेल्या हल्ल्यात भारताची ८० लढाऊ विमानं सहभागी होती आणि भारताच्या या हल्ल्याबाबत आम्हाला आधीच गुप्तचर यंत्रणेने माहिती दिली होती, असा दावाही त्यांनी केला आहे. आमचे सशस्त्र दल २४ तास हाय अलर्टवर होते. मातृभूमीच्या रक्षणासाठी आम्ही तयार आहोत. पहलगाम हल्ल्याची पारदर्शक चौकशी करण्याची आमची मागणी आहे, असा कांगावा शरीफ यांनी केला.

Previous Post

मोठी बातमी! बॉम्बस्फोटांनी पाकिस्तानातील लाहोर हादरलं, जीव वाचविण्यासाठी लोकांची पळापळ

Next Post

मोठी बातमी | मिरज रेल्वे प्रशासनाची कारवाई, ७० वर्षांची झोपडपट्टी जमीनदोस्त

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | मिरज रेल्वे प्रशासनाची कारवाई, ७० वर्षांची झोपडपट्टी जमीनदोस्त

मोठी बातमी | मिरज रेल्वे प्रशासनाची कारवाई, ७० वर्षांची झोपडपट्टी जमीनदोस्त

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group