• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

वरिष्ठ पोलीस अधिकारी मनिषा दुबुले, संजीव झाडे यांना विशेष पोलिस महासंचालक पदक जाहीर; राज्यातील ८०० पोलिसांचा समावेश

Admin by Admin
April 29, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, विशेष
1 min read
0
वरिष्ठ पोलीस अधिकारी मनिषा दुबुले, संजीव झाडे यांना विशेष पोलिस महासंचालक पदक जाहीर; राज्यातील ८०० पोलिसांचा समावेश
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

कोल्हापूर येथील राज्य गुन्हे अन्वेषणच्या अधीक्षक मनीषा दुबुले आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्यासह जिल्ह्यातील १७ जणांना आज विशेष पोलिस महासंचालक पदक जाहीर झाले.

राज्याच्या पोलिस महासंचालक रश्‍मी शुक्ला यांच्याकडून आज २०२४ मधील पदके जाहीर झाली. त्यात राज्यातील पोलिस अधीक्षकांपासून पोलिस शिपाई पदापर्यंतच्या ८०० पोलिसांचा समावेश आहे. महाराष्ट्र दिनी १ मे रोजी याचे वितरण होणार आहे. या सर्वांनी त्यांच्या सेवेत केलेल्या विशेष कामगिरीबद्दल हे पदक जाहीर झाले आहे.

अधीक्षक दुबुले मूळच्या कोल्हापूरच्या आहेत. त्यांचे गाव आसुर्ले (ता. पन्हाळा) आहे. त्या राज्य गुन्हे अन्वेषणच्या अधीक्षक म्हणून गेली दोन वर्षे कोल्हापुरात कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी सांगली येथे अपर पोलिस अधीक्षक, दौंड येथे प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य, वासिम, लातूर येथेही सेवा बजावली आहे. त्यांना यापूर्वी अनेक पदके मिळाली आहेत. निरीक्षक झाडे जुना राजवाडा पोलिस ठाण्यात वर्षभर कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी तीन वर्षे कोडोली आणि शहापूर, इचलकरंजी, मिरज व तासगांव येथे काम केले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच तपासात त्यांचा हातखंडा आहे.

अन्य पदकप्राप्त असे : पोलिस निरीक्षक – रविराज अनिल फडणीस, उपनिरीक्षक – जालिंदर अंकुश जाधव, नरसू भारमाना गावडे, महादेव नारायण कुराडे, अनिल संभाजी जाधव, जनार्दन शिवाजी खाडे. हवालदार – संजय दिनकर कुंभार, राजू रामचंद्र पट्टणकुडे, अरुण रवींद्र खोत, सागर जगन्नाथ चौगुले, हिंदुराव रामचंद्र केसरे, अनुराधा देवदास पाटील, रमेश श्रीपती काबंळे, युवराज भिवाजी पाटील, पोलिस शिपाई संग्राम पांडुरंग पाटील.

Previous Post

ब्रेकिंग | आमदार खाडेंच्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ..! मेंढे म्हणाले, ‘खाडे जे बोलले ते एकदम’…! वाचा सविस्तर

Next Post

कुपवाड ब्रेकिंग |एमआयडीसीत हाताची चार बोटं तुटली, गोपीकिसन सारडा मिल’ला न्यायालयाचा दणका, कामगाराला मिळाला न्याय..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाड ब्रेकिंग |एमआयडीसीत हाताची चार बोटं तुटली, गोपीकिसन सारडा मिल’ला न्यायालयाचा दणका, कामगाराला मिळाला न्याय..!

कुपवाड ब्रेकिंग |एमआयडीसीत हाताची चार बोटं तुटली, गोपीकिसन सारडा मिल'ला न्यायालयाचा दणका, कामगाराला मिळाला न्याय..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group