• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | ‘या’ पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करा, निवेदनाद्वारे मागणी..!

Admin by Admin
April 17, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सांगली | ‘या’ पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करा, निवेदनाद्वारे मागणी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

आटपाडी प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना काही पोलीस अधिकारी पदाचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे सोने रिकव्हरी आणि वसुली करून सराफांना त्रास देतात, असा आरोप सराफ संरक्षण समितीने केला आहे.

याबाबत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन देत समितीने त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

यावेळी सराफ आणि सुवर्णंकार संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष उमेश बुऱ्हाडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जगदीश कांबळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेश टाक, पुणे जिल्हाध्यक्ष प्रथमेश नगरकर, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष ओंकार गटगिळे, गणेश मैड, हितेश पंडित, सोमनाथ अवताडे, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख उमेश बागडे, पीडित सराफ आणि पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील पुणे, पाटस, यवत, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि वैराग, सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील सराफांना वेठीस धरून त्यांच्याकडुन सक्तीची वसुली करण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. परंतु अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही, असे या निवेदनात म्हटले आहे. या घटनांचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य रेकॉर्डची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी. भ्रष्ट, बेजाबबदार तपास अधिका-यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | देवेंद्र फडणवीसांच्या काळातील पाटबंधारे टेंडरवर खासदार विशाल पाटलांना संशय, पडळकरांवरही साधला निशाणा..!

Next Post

सांगली | अवैध धंदेवाल्यांना हवाय आमदारांचा वरदहस्त.?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीत पुन्हा मोठा राजकीय भूकंप..! थेट जिल्हाप्रमुखासह शेकडोजण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत..! आज होणार पक्षप्रवेश,वाचा सविस्तर..

सांगली | अवैध धंदेवाल्यांना हवाय आमदारांचा वरदहस्त.?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group