• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | कवठेमहांकाळ शहरात बंद घरात वासाने अक्षरशः मळमळत होतं, पोलिसांनी दरवाजा उघडताच धक्कादायक माहिती समोर, सर्वत्र खळबळ..!

कवठेमहांकाळमध्ये ६० वर्षीय महिलेचा गळा आवळून खून?

Admin by Admin
March 26, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | कवठेमहांकाळ शहरात बंद घरात वासाने अक्षरशः मळमळत होतं, पोलिसांनी दरवाजा उघडताच धक्कादायक माहिती समोर, सर्वत्र खळबळ..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  • कवठेमहांकाळ प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

कवठेमहांकाळ शहरातील जत रोडवर असलेल्या डायमंड बिअर बार समोरील रस्त्यालगत असलेल्या एका बंद असलेल्या खोलीत वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला असून या खोलीला बाहेरून कुलूप असल्याने हा खून असावा अशी चर्चा शहरामध्ये दिवसभर चालू होती.

वृध्द महिलेचे नाव शांताबाई शंकर जाधव (वय ६० वर्षे) असून मृत महिला ही कोकळे गावची होती. असे बोलले जात होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कवठेमहांकाळ शहरात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तळ ठोकला आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, कवठेमहांकाळ शहरातील धुळगांव रस्त्यालगत असणाऱ्या डायमंड बिअर बार समोर जाणाऱ्या रस्त्यालगत भाड्याच्या खोलीमध्ये शांताबाई जाधव ही वृध्द महिला काही दिवसांपासून राहत होती. गेल्या काही दिवसांपासून महिलेच्या घरातून घाण वास येत असल्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घराची तपासणी केली असता, कुलूप तोडून आत प्रवेश करताच शांताबाई जाधव यांचा मृतदेह आढळला.

मयत शांताबाई जाधव यांचा खून करून संशयितांनी बाहेरून कुलूप लावलेले असावे, अशी चर्चा सुरू होती. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलिस अधिकारी जत सुनील साळुंखे, कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे, अभिजीत कासार यांनी भेट देऊन परिस्थितीचा मागोवा घेतला.

पोलिसांनी अधिक तपास केला असता वृध्द महिलेचा गळा आवळून खून झाल्याचे प्रथमदर्शी दिसून येत असून, वृध्द महिलेचा नेमका कुणी खून केला व कोणत्या कारणाने खून केला हे अजून उघड झाले नाही. या खुनाच्या घटनेचा कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत चालू होते. वृध्द महीलेच्या खुनाच्या घटनेने कवठेमहांकाळ तालुक्यासह शहरात खळबळ माजली आहे.

Previous Post

‘शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, ते फक्त …’ संभाजी भिडेंचे मोठं विधान..!

Next Post

ब्रेकिंग | अल्पवयीन मुलीचा विवाह; वडिलांसह, सासरच्या लोकांवर गुन्हा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | अल्पवयीन मुलीचा विवाह; वडिलांसह, सासरच्या लोकांवर गुन्हा

ब्रेकिंग | अल्पवयीन मुलीचा विवाह; वडिलांसह, सासरच्या लोकांवर गुन्हा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group