• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचा बडा नेता अडचणीत; पोलिसांनी केली अटक

Admin by Admin
March 26, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीत पुन्हा मोठा राजकीय भूकंप..! थेट जिल्हाप्रमुखासह शेकडोजण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत..! आज होणार पक्षप्रवेश,वाचा सविस्तर..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

खंडणी मागितल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांच्यासह दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. इचलकरंजी शहरातील एका सोनाराला बँकेच्या व्यवहार पूर्ण कर, नाही तर संपूर्ण परिवाराला मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितली होती.

शहरातील भोनेमाळ परिसरातील असणाऱ्या भाजपच्या (BJP) कार्यालयामध्ये सोनाराला आणून धमकी दिली होती. या प्रकरणावर पोलीसाकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात होता. पण सबंधित सोनाराने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

माजी नगरसेवक मनोज साळुंखे, माजी नगरसेवक बाजीराव कुंभार, शहानवाज मुजावर या तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी इचलकरंजी पोलिसांनी भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखेना अटक केली आहे.

जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथील एका सराफ व्यावसायिकाला बोगस सोने विक्रीचे खोटे गुन्हे दाखल करण्याचे धमकी देत पाच लाखाची खंडणी मागण्याचा प्रकार इचलकरंजीत घडला. त्यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांच्यासह आम्ही दोघांनी हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

14 ते 18 मार्च दरम्यान सराफ व्यावसायिक पंकज दानवाडे याला माजी नगरसेवक मनोज साळुंखे, बाजीराव कुंभार, शहानवाज मुजावर यांनी राजर्षी शाहू महाराज पुतळा रिंग रोडवरील एका ऑफिसमध्ये बोलवून घेतले होते. यावेळी शहानवाज यांनी दानवाडे यांच्याकडे पैशाची मागणी करत मारहाण केली. पाच लाख रुपये दिल्याशिवाय सोडणार नाही, अशी धमकी देत मारहाण केली होती.

त्यामुळे घाबरलेल्या दानवाडे यांनी भीतीपोटी 50 हजार रुपये देऊन सुटका केली. अन्यथा कुटुंबाला ठार मारेल, अशी धमकी दिली असल्याची तक्रार दानवडे यांनी केली.या तक्रारीनंतर तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

साळुंखे यांच्यावर आतापर्यंत जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात सतरा गुन्हे नोंद आहेत. तर बाजीराव कुंभार आणि मुजावर यांच्यावर देखील गुन्हे असून ते सराईत गुन्हेगार आहेत. या प्रकरणी इचलकरंजी पोलिसांनी भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखेना अटक केली आहे.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | ईदचा बाजार करुन घरी जाताना अपघातात दोन मुलासह तिघे ठार, महिला गंभीर

Next Post

शिंदेंच्या शिवसेनेत पद घ्यायचे असेल तर काय करावे लागेल, शहरप्रमुख गोल्डनमॅन रजपूत काय म्हणाले..! वाचा सविस्तर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शिंदेंच्या शिवसेनेत पद घ्यायचे असेल तर काय करावे लागेल, शहरप्रमुख गोल्डनमॅन रजपूत काय म्हणाले..! वाचा सविस्तर

शिंदेंच्या शिवसेनेत पद घ्यायचे असेल तर काय करावे लागेल, शहरप्रमुख गोल्डनमॅन रजपूत काय म्हणाले..! वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group