- खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
मिरजेतील नेते सिद्धार्थ जाधव, जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्यासह माजी जिल्हाप्रमुख प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. दोन दिवसांत सर्वांचा मुंबईत पक्षप्रवेश होणार असल्याच्या वृत्ताला सिद्धार्थ जाधव यांनी दुजोरा दिला आहे.
संजय विभुते यांच्या पक्षप्रवेशाला आमदार सुहास बाबर यांचा विरोध असल्याने विभुते यांनी थेट एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रवेशाला संमती मिळविल्याची चर्चा आहे. शिंदेसेनेत प्रवेशानंतर संजय विभुते यांना जिल्हाप्रमुखपदाचे आश्वासन मिळाले आहे. मात्र, उद्धवसेनेतून येणाऱ्यांना कोणत्याही पदाचे आश्वासन दिले नाही. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देणाऱ्यांना पद मिळणार असल्याचे शिंदेसेनेचे शहर प्रमुख किरणसिंग रजपूत यांनी सांगितले.

