• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली वनविभागाच्या उपवनसंरक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल…

Admin by Admin
May 7, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
0
सांगली वनविभागाच्या उपवनसंरक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली वनविभागाचे उपवनसंरक्षक विजय माने यांनी कार्यालयातील एका वनपरिक्षेत्र अधिकारी महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला.

पीडित महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने संशयित माने यांच्या विरोधात कुपवाड पोलिस ठाण्यात रात्री उशिरा तक्रार दाखल केली. पोलिसांनी उपवनसंरक्षक याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वनपरिक्षेत्र महिला अधिकारी ही २८ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी उपवनसंरक्षक विजय माने यांच्या केबिनमध्ये सरकारी कामाची माहिती देण्यासाठी गेली होती. त्यावेळी संशयित माने यांनी डायरीतील नोंदी बघण्याचा बहाणा करून तिला जवळ बोलावून घेतले. त्यानंतर लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. अशी तक्रार पीडित महिलेने कुपवाड पोलिसात दाखल केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच मिरजेचे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक वीरकर यांनी तातडीने कुपवाड पोलिस ठाण्यात धाव घेऊन पीडित महिला अधिकाऱ्याची विचारपूस केली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी उपवनसंरक्षक माने याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील करीत आहेत. दरम्यान, उपवनसंरक्षक विजय माने हे सध्या प्रशिक्षणासाठी अमरावती येथे गेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Previous Post

आयपीएस कृष्णप्रकाश यांच्यासाठी २०० कोटींची वसुली..? पोलीस दलात खळबळ उडवणारे पत्र व्हायरल…

Next Post

तलाठी दिलीप चौरेंवर कारवाई होणार की आरपीआय आंदोलन करणार..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तलाठी दिलीप चौरेंवर कारवाई होणार की आरपीआय आंदोलन करणार..?

तलाठी दिलीप चौरेंवर कारवाई होणार की आरपीआय आंदोलन करणार..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group