• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कर्नाळच्या तलाठ्यासह दोघांना लाच मागितल्याप्रकरणी अटक; ‘साता-बारा’वर नोंदणीसाठी पन्नास हजारांची मागणी

Admin by Admin
March 21, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
महाराष्ट्र शासन साजरा करतेय वर्षभर ‘व्हॅलेंटाईन डे’ ! शासनाचे ‘त्या’ 482 अधिकारी, कर्मचारी यांच्यावर विशेष ‘प्रेम’; ‘अँटी करप्शन’च्या कारवाईनंतरही खुर्चीवर टिकून, शिक्षा झाल्यानंतरही 20 अधिकारी, कर्मचाऱ्यांना केले नाही अजूनही ‘बडतर्फ’
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

एक गुंठा शेत जमीन क्षेत्राची सातबारा उताऱ्यावर नोंदणी करण्यासाठी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी कर्नाळच्या (ता. मिरज) तलाठ्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

तलाठी तानाजी पांडुरंग फराकटे (४९, रा. फ्लॅट नं. ५, हिरा अपार्टमेंट, एसटी कॉलनी, विश्रामबाग) व एजंट गणेश विश्वास कांबळे (३०, रा. पद्माळे, ता. मिरज) अशी दोघांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी कर्नाळ येथे एक गुंठा जमीन खरेदी केली होती. याची सात बारा उताऱ्यावर नोंदणी करण्यासाठी तलाठी फराकटे यांची भेट घेतली. तेव्हा फराकटे याने ५० हजार रुपयांची मागणी केली. याबाबतची तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २८ जानेवारी २०२५ रोजी तक्रार दिली.

तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २९ व ३० जानेवारी रोजी पडताळणी केली. तेव्हा तलाठी फराकटे याने पंचाच्या समक्ष ५० हजार रुपये लाच मागितली, तसेच तडजोडीअंती ४० हजारांची मागणी करून एजंट गणेश कांबळे याला जाऊन भेटण्यास सांगितले, असे स्पष्ट झाले.

शिवाय पडताळणी दरम्यान एजंट कांबळे यानेही तक्रारदार यांच्या कामासाठी ५० हजार रुपये मागितले आणि रक्कम कमी करण्याची विनंती केली असता, त्यानेही तलाठी कांबळे यांना भेटा, असे सांगून लाच देण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांनी प्रत्यक्षात लाच स्वीकारली नाही, परंतु लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यामुळे गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली. उपाधीक्षक उमेश पाटील, निरीक्षक किशोरकुमार खाडे, कर्मचारी ऋषिकेश बडणीकर, सलीम मकानदार, चंद्रकांत जाधव आदींच्या पथकाने कारवाई केली.

Previous Post

मोठी बातमी | महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा : सांगली जिल्ह्यातील महसूलमधील भ्रष्टाचाऱ्यांना मोठा दणका, चुकीचे काम करणाऱ्यांवर होणार कारवाई

Next Post

सांगली | सख्ख्या चुलत भावाला कोयत्याने वार करत संपवलं

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | सख्ख्या चुलत भावाला कोयत्याने वार करत संपवलं

सांगली | सख्ख्या चुलत भावाला कोयत्याने वार करत संपवलं

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group