• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज ब्रेकिंग | आलिशान कारमधून आले, गाडीत गावठी पिस्तूल, तीन काडतूसं; पोलिसांनी डाव उधळला : दोन अट्टल गुन्हेगारासंह तिघांना अटक..!

Admin by Admin
March 19, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज ब्रेकिंग | आलिशान कारमधून आले, गाडीत गावठी पिस्तूल, तीन काडतूसं; पोलिसांनी डाव उधळला : दोन अट्टल गुन्हेगारासंह तिघांना अटक..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • मिरज प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरज शहर पोलिसांनी कवठेमहंकाळ येथील दोन अट्टल गुन्हेगारासंह तिघांना अटक करून त्यांच्या कडून गावठी पिस्तूल हस्तगत केले. आरोपीकडून एक आलिशान मोटार, गावठी पिस्तूल, तीन काडतूसे व चार मोबाईल असा २७ लाखाचा ऐवज जप्त केला. दि. १९ रोजी रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक किरण रासकर हे पथकासह पेट्रोलींग करताना कमानवेस येथील फायरब्रिगेड स्टेशनलगत एका अलिशान मोटारीत तिघेजण संशयास्पदरित्या थांबले होते. त्यांची झडती घेतल्यावर एक देशी बनावटीचे पिस्टल, व तीन जीवंत काडतुसे सापडली.

पोलिसांनी अक्षय बंजरंग खोत,अमर ऊर्फ संतोष जयराम खोत ,अविनाश बबन हारगे यांना ताब्यात घेवुन त्यांचेविरोधात गुन्हा दाखल केला.अक्षय बजरंग खोत, वय २९, रा. थबडेवाडी, ता . कवठेमहंकाळ, अमर ऊर्फ संतोष जयराम खोत, वय ३२, रा पिंपळवाडी, ता. कवठेमहंकाळ, अविनाश बबन हारगे, वय २८ , रा. मोरगाव, ता. कवठेमहंकाळ, या तिघांना अटक केली. त्यांनी अक्षय शंकर पाटील रा. डफळापुर, ता. जत याच्याकडून पिस्तूल आणल्याची कबुली दिल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी एमएच१४ जीएस ७१७१ ही २५ लाख रुपये किमंतीची आलिशान मोटार, ४० हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल, मॅगजिन ,३ हजार रुपये किमंतीची तीन जीवंत काडतुसे,१लाख ७१हजार रुपये किमंतीचे ४ मोबाईल, असा २७ लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला.

पोलीस निरीक्षक किरण रासकर, सपोनि. आण्णासाहेब गादेकर, सपोफौ कदम, पोहेकों गजानन बिरादार, सचिन सनदी, पोहेकों पृथ्वी कांबळे यांच्या पथकाने तिघांना अटक केली असुन त्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

यातील अमर व अक्षय खोत हे दोन आरोपी सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर खुन व दरोडयासारखे गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

सांगली- कोल्हापूर ब्रेकिंग | ‘तू गाव सोडून जा, अन्यथा तुझ्या बायकोवर सगळ्यांना बलात्कार करायला लावीन’ म्हणत व्यवसायातील वादातून भयानक मारहाण: व्हिडिओ काढला, चौघांवर गुन्हा दाखल

Next Post

मोठी ब्रेकिंग | गोपीचंद पडळकरांनी देवस्थानची ३४ एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत खाडेंचा गंभीर आरोप..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | गोपीचंद पडळकरांनी देवस्थानची ३४ एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत खाडेंचा गंभीर आरोप..!

मोठी ब्रेकिंग | गोपीचंद पडळकरांनी देवस्थानची ३४ एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत खाडेंचा गंभीर आरोप..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group