• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली- कोल्हापूर ब्रेकिंग | ‘तू गाव सोडून जा, अन्यथा तुझ्या बायकोवर सगळ्यांना बलात्कार करायला लावीन’ म्हणत व्यवसायातील वादातून भयानक मारहाण: व्हिडिओ काढला, चौघांवर गुन्हा दाखल

Admin by Admin
March 19, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली- कोल्हापूर ब्रेकिंग | ‘तू गाव सोडून जा, अन्यथा तुझ्या बायकोवर सगळ्यांना बलात्कार करायला लावीन’ म्हणत व्यवसायातील वादातून भयानक मारहाण: व्हिडिओ काढला, चौघांवर गुन्हा दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • हातकणंगले प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

व्यवसायातील वादातून एकास मारहाण करण्याची घटना घडली. या मारहाणीचा व्हिडिओही काढण्यात आला असून, संशयितांनी लाकडी काठी, रॉडने पाठीवर व पायावर वळ उठेपर्यंत मारहाण केली आहे.

तसेच ‘गाव सोडून जा, अन्यथा तुझ्या बायकोवर सगळ्यांना बलात्कार करायला लावीन’, अशी धमकीही संशयितांकडून दिल्याचेही समोर आले आहे. संशयितावर हातकणंगले पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

माले येथील बाबा हॉटेलमध्ये मेनू कार्ड बघण्याच्या कारणावरून मारहाण झाली. याबाबत फिर्यादीने तक्रार दिली. यावरून संशयित टिपू सुलतान खतीब, मोहम्मद कुरेशी, प्रवीण नाथा पाटील, मनोज संजय कांदे यांच्याविरुद्ध हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

सोमवारी दुपारी तीन वाजता कोल्हापूर-सांगली मार्गावरील माले येथे हॉटेल बाबा जवळच्या पानटपरीमध्ये फिर्यादी थांबला होता. त्याला संशयित मनोज कांदे याने हॉटेलमध्ये बोलावले. तो मेनू कार्ड पाहत असताना संशयित मोहम्मद कुरेशी, प्रवीण पाटील व मनोज कांदे यांनी फिर्यादीसोबत असलेल्या एकाला मेनू कार्ड का बघितलास? असे म्हणून मारहाण करून जखमी केले.

संशयित टिपू सुलतान खलिफा याने फिर्यादीच्या डोक्याला पिस्तूल लावून दारू पाजली आणि त्याचा व्हिडिओ बनविला. तसेच, ‘तू आणि तुझी बायको उद्याच्या उद्या निघून जा,’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटल्याचे हातकणंगले पोलिसांनी सांगितले.

Previous Post

सांगली ब्रेकींग | जिल्ह्यातील ‘हे’ चार माजी आमदार करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश..!

Next Post

मिरज ब्रेकिंग | आलिशान कारमधून आले, गाडीत गावठी पिस्तूल, तीन काडतूसं; पोलिसांनी डाव उधळला : दोन अट्टल गुन्हेगारासंह तिघांना अटक..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज ब्रेकिंग | आलिशान कारमधून आले, गाडीत गावठी पिस्तूल, तीन काडतूसं; पोलिसांनी डाव उधळला : दोन अट्टल गुन्हेगारासंह तिघांना अटक..!

मिरज ब्रेकिंग | आलिशान कारमधून आले, गाडीत गावठी पिस्तूल, तीन काडतूसं; पोलिसांनी डाव उधळला : दोन अट्टल गुन्हेगारासंह तिघांना अटक..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group