• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत बंदोबस्तात वाढ, शहरांमध्ये पोलीस यंत्रणा सतर्क

Admin by Admin
March 19, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मिरजेत बंदोबस्तात वाढ, शहरांमध्ये पोलीस यंत्रणा सतर्क

मिरज मार्केट परिसरात सतर्क पोलिस यंत्रणा

4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • मिरज प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर सांगली व मिरज शहरांमध्ये पोलीस यंत्रणा सतर्क करण्यात आली असून मिरजेत राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे.

बजरंग दलाच्यावतीने मंगळवारी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी करण्यात आली.

नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून सोमवारी रात्रीपासून हिंसक घटना घडल्यानंतर सांगली जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मोक्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून संशयास्पद व्यक्तींच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येत आहे.

मिरज मार्केट परिसरात सतर्क पोलिस यंत्रणा

मिरज शहर संवेदशनशील म्हणून ओळखले जाते. यामुळे मंगळवारी सकाळपासूनच कोल्हापूरहून राज्य राखीव दलाची तुकडी बंदोबस्तासाठी मिरजेत दाखल करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून लक्ष्मी मार्केटमधील महाराणा प्रताप चौकात राज्य राखीव दल बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. तसेच सराफ कट्टा, गणेश तलाव, गुरुवार पेठ, महात्मा गांधी चौक आदी ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. संशयास्पद व्यक्तींच्या हालचालीवर करडी नजर ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष आकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनात खुलदाबादमधील औरंगजेबची कबर उखडून टाकण्याची आग्रही मागणी सरकारला करण्यात आली आहे.

Previous Post

धक्कादायक बातमी | सांगलीत कोयता नाचवत अक्षरशः धिंगाणा, दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण, पोलिसही चिडले..!

Next Post

सांगली ब्रेकींग | जिल्ह्यातील ‘हे’ चार माजी आमदार करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकींग | जिल्ह्यातील ‘हे’ चार माजी आमदार करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश..!

सांगली ब्रेकींग | जिल्ह्यातील 'हे' चार माजी आमदार करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group