• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मॅडम स्वतः संजय राऊतांचे फोन ऐकायच्या, ‘त्या’ जबाबामुळे पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा पाय खोलात…

Admin by Admin
May 6, 2022
in क्राईम
1 min read
0
मॅडम स्वतः संजय राऊतांचे फोन ऐकायच्या, ‘त्या’ जबाबामुळे पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा पाय खोलात…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई: फोन टॅपिंग प्रकरणात पोलीस अधिकारी रश्मी शुक्लांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. शुक्ला स्वत: शिवसेना खासदार संजय राऊतांचे कॉल ऐकायच्या.

राऊत कोणाला भेटतात, कोणत्या नेत्यांशी बोलतात, यावर लक्ष ठेवा. त्यांचे कॉल ऐकून रिपोर्ट द्या, अशा सूचना शुक्ला यांनी केल्या होत्या, असा जबाब एका अंमलदारानं नोंदवला आहे. त्यामुळे शुक्ला यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

२०१९ मध्ये संजय राऊतांचा फोन टॅप करण्यात आला होता. जवळपास ६० दिवस राऊतांचा फोन टॅप केला गेला. राऊत फोनवर कुणाचा उल्लेख साहेब म्हणून करतात, यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना शुक्ला यांनी दिल्याचा जबाब पोलीस अंमलदारानं नोंदवला आहे. हा अंमलदार त्यावेळी गुप्तवार्ता विभागात कार्यरत होता. या प्रकरणी पोलिसांनी ७०० पानांचं आरोपपत्र तयार केलं असून त्यात १८ जणांचे जबाब आहेत.

संजय राऊतांचा फोन टॅप करताना त्यांचा उल्लेख एस. रहाटे असा करण्यात आला होता. मात्र अंमलदारानं राऊतांचा आवाज ओळखला. रहाटे (राऊत) कोणासोबत बोलतात, कोणत्या घडामोडी, बैठकांचा उल्लेख करतात, मातोश्री आणि सह्याद्री अतिथीगृहाबद्दल काय म्हणतात, याची नोंद ठेवण्याचे आदेश शुक्लांनी दिले होते असं अंमलदारानं जबाबात म्हटलं आहे.

फोन टॅपिंग प्रकरणात २ बड्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. मुख्य गुप्तचर अधिकारी, सहाय्यक आयुक्त यांच्याकडून फोन टॅपिंग सुरू होतं. राऊतांचे फोन स्वत: रश्मी शुक्ला ऐकायच्या. फोन टॅपिंग वैध आहे की अवैध याची माहिती आम्हाला नव्हती. आम्हाला केवळ आदेश देण्यात आले होते, असा जबाब अंमलदारानं नोंदवला आहे.

Previous Post

सांगलीकरांना मिळणार वारणेचे पाणी….

Next Post

सांगली | तब्बल अकराशे शेततळ्यांचे गांव – मणेराजुरी..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post

सांगली | तब्बल अकराशे शेततळ्यांचे गांव - मणेराजुरी..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group