• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकींग | आलिशान चारचाकीने दहा वाहनांना उडविले

Admin by Admin
March 16, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली ब्रेकींग | आलिशान चारचाकीने दहा वाहनांना उडविले
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली-खोतवाडी रस्त्यावर शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास हिट अ‍ॅण्ड रनची थरारक घटना घडली. बेदरकार वाहनचालकाने रस्त्यावरील आठ ते दहा दुचाकीना उडविले. माधवनगर, बुधगावच्या नागरिकांसह वाहनधारकांनी गाडीचा पाठलाग केला.

अंगाचा थरकाप उडविणार्‍या या घटनेत पाच ते सहा जण जखमी झाल्याचे समजते. दुचाकीसह चारचाकीचे मोठे नुकसान झाले.

सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तत्काळ धाव घेतली. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. नीतेश पाटील असे चालकाचे नाव असून तो आटपाडी तालुक्यातील असल्याचे समजते. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, संशयित पाटील हा आटपाडी तालुक्यातील एका गावातील असल्याची माहिती आहे. त्याच्या ताब्यातील फॉर्च्युनर ही आलिशान कार घेऊन माधवनगर ते बुधगाव या रस्त्याने आज रात्री साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास निघाला होता. सुरवातीला त्याने वसंतदादा कारखान्यासमोर एका दुचाकीला धडक दिली. त्यांनतर रस्त्यावर आडव्या येणार्‍या आठ ते नऊ वाहनांना जोराची धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बुधगाव येथे एका मोटारसायकलस्वाराला त्याने फरफटत नेले. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला तर दुचाकीचे मोठे नुकसान झाले. नागरिक पाठलाग करत असल्याचे पाहून त्याने तशीच भरधाव वेगात गाडी खोतवाडीकडे नेली. गावच्या स्वागत कमानीला गाडी धडकवल्याने शेतात गाडी गेली. माधवनगर, बुधगावच्या गावकर्‍यांनी फॉर्च्युनरचा पाठलाग करून चालकाला पकडले. गाडीतील चालक व महिला दोघेही जखमी झाले.

सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगुले यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनेची माहिती मिळताच धाव घेतली. पोलिसांनी जमावाला बाजूला करीत चालकाला ताब्यात घेतले. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी रात्री उशिरा सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Previous Post

सांगलीत सव्वादोन लाखांच्या भांगेच्या गोळ्या जप्त..!

Next Post

तेच तेच चेहरे टाळून तरुणांना यापुढे संधी : आ. जयंत पाटील

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तेच तेच चेहरे टाळून तरुणांना यापुढे संधी : आ. जयंत पाटील

तेच तेच चेहरे टाळून तरुणांना यापुढे संधी : आ. जयंत पाटील

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group