• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत सव्वादोन लाखांच्या भांगेच्या गोळ्या जप्त..!

Admin by Admin
March 16, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीत सव्वादोन लाखांच्या भांगेच्या गोळ्या जप्त..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी | सांगलीवाडी येथे धुळवडीनिमित्त भांगेच्या गोळ्यांची विक्री करणारा दीपक राधेश्याम केवट (वय २६, रा. कॉलेजच्या पाठीमागे, सांगलीवाडी, मूळ रा. कुन्नुकाडेल, जि. फत्तेपूर सिक्री, उत्तर प्रदेश) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली.

त्याच्याकडून २ लाख २७ हजार २८० रुपयांच्या ११ किलो ३१४ ग्रॅम भांगेच्या गोळ्या जप्त केल्या.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक सांगली शहर परिसरात १५ मार्च रोजी गस्त घालत होते. सहायक निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकातील कर्मचारी सोमनाथ पतंगे यांना सांगलीवाडीत भंगार दुकानाजवळ दीपक केवट हा धुळवडीनिमित्त भांगेच्या गोळ्या विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पथकाने सांगलीवाडीत जाऊन पाहणी केली. तेव्हा भंगार दुकानाजवळ संशयित तरुण भांगेच्या गोळ्या विक्री करीत असल्याचे दिसून आले. पथकाने त्याला ताब्यात घेतले. दुकानाची झडती घेताना बॅरेलमध्ये भांगेच्या गोळ्या मिळून आल्या.

गोळ्या कुठून आणल्या याची चौकशी केल्यानंतर त्याने कुन्नुकाडेला या उत्तर प्रदेशातील गावातून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. एकूण ११ किलो ३१४ ग्रॅम भांगेच्या गोळ्या जप्त केल्या. २ लाख २६ हजार ७८० रुपयांच्या गोळ्या व रोख पाचशे रुपये असा २ लाख २७ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिस कर्मचारी सोमनाथ पतंगे यांनी शहर पोलिस ठाण्यात केवट याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. केवट याला मुद्देमालासह शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक सावंत, कर्मचारी इम्रान मुल्ला, अमोल ऐदाळे, संकेत मगदूम, अतुल माने, आमसिद्ध खोत, बाबासाहेब माने, अनंत कुडाळकर, रोहन घस्ते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Previous Post

इचलकरंजीत दोन गटांत जोरदार राडा, १३ जणांना अटक

Next Post

सांगली ब्रेकींग | आलिशान चारचाकीने दहा वाहनांना उडविले

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकींग | आलिशान चारचाकीने दहा वाहनांना उडविले

सांगली ब्रेकींग | आलिशान चारचाकीने दहा वाहनांना उडविले

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group