Saturday, June 7, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकींग | 🚨 तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा; सहा लाखांचा मुद्देमाल केला जप्त

Admin by Admin
March 9, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
0
मोठी बातमी | राज्याच्या राजकारणात एकच खळबळ.! सांगलीत ठाकरे गटाचा भाजपच्या ‘या’ उमेदवाराला जाहीर पाठिंबा!
  • सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

एका पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये सुरू असलेला तीन पानी जुगार अड्डा उध्वस्त करत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकला. याठिकाणी जुगार खेळणाऱ्या नऊ जणांवर कारवाई करून रोकड, मोबाईल, वाहने असा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पलूस तालुक्यात जुगार अड्ड्यावर केलेल्या या मोठ्या कारवाईने खळबळ उडाली होती.

दिलीप लक्ष्मण माने (५७, चोपडेवाडी), कुष्णात शिवाजी सूपणेकर (३०, माळवाडी), हणमंत मारुती नलवडे (४८ माळवाडी), भारत शिवाजी पवार (४२ विटा नाका, तासगाव), बालेचाँद यासिन सलामत (६६, चोपडेवाडी), धनाजी हणमंत माने (३२, चोपडेवाडी), नरेंद्र विलास कांबळे (३६, तासगाव), उत्तम मारुती गराडे (५०, भिलवडी) आणि राहुल संभाजी जाधव (२७, निमणी) अशी कारवाई केलेल्या संशयितांची नावे आहेत.

जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाईच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार अधीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वात खास पथक तयार करण्यात आले आहे. पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथे दिलीप लक्ष्मण माने हा पैसे लावून बेकायदेशीर स्वतःच्या फायद्यासाठी साथीदारांसह तीन पानी जुगार अड्डा चालवत आहे, अशी माहिती पथकास मिळाली.

यानंतर तत्काळ सायबर पोलिस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी जाऊन पहिले असता पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये नऊ जण तीन पानी जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्याठिकाणी छापा टाकून नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, भिलवडी पोलिसांनी परिसरात बेकायदा व्यवसायांवर नजर ठेवली आहे.

Previous Post

बिग ब्रेकिंग | सतेज पाटलांचे पुतणे पृथ्वीराज पाटील यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल:लग्नाचे खोटे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप..

Next Post

मिरज ब्रेकिंग | बसचालक-वाहकाला बेदम मारहाण

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

मिरज ब्रेकिंग | बसचालक-वाहकाला बेदम मारहाण

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014