• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | आयपीएस संदीपसिंह गिल्ल व वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या अंगावर पेट्रोल टाकले, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याचे कृत्य

Admin by Admin
March 9, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | आयपीएस संदीपसिंह गिल्ल व वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या अंगावर पेट्रोल टाकले, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याचे कृत्य
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते नरेंद्र पावटेकर यांनी आंदोलना दरम्यान पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले.

सुदैवाने पुढील अनुचित घटना थोडक्यात टळली. यावर पोलिसांनी आंदोलकांना चांगलाच चोप देत अद्दल घडवली. ही घटना महापालिका मेट्रो स्थानकावरील मेट्रो मार्गिकेवर घडली. याप्रकरणी १५ ते २० कार्यकर्त्यांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते नरेंद्र पावटेकर यांनी दुपारी दोनच्या सुमारास महापालिका मेट्रो स्टेशनमध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. जाताना त्यांच्या हातामध्ये पेट्रोलच्या बाटल्या होत्या. सोबत काही महिला कार्यकर्त्याही होत्या. त्यांनी थेट मेट्रो मार्गिकेवर (ट्रॅक) धाव घेत आंदोलन सुरु केले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस उपायुक्त गिल्ल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना हात जोडून तब्बल तासभर विनंत्या केल्या. त्यांची समजूत काढून खाली उतरुण तोडगा काढू असेही सांगितले.

मात्र आंदोलक ऐकण्यास तयारीत नव्हते. एवढ्यात पावटेकर आणि एक तरुण मार्गिर्किवरील कढड्यावर चढले. तेथून ते कधीही तोल जाऊन खाली पडले असते. गिल्ल यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना शिवीगाळ करण्यात आली. यामुळे त्यांनी पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांना फोन लावून दिला. मात्र पावटेकर यांनी जगताप यांनाच शिवीगाळ करत ते आम्हाला पुढे येऊ देत नाही असे म्हणत बोलण्यास नकार दिला.

परिस्थितील हाताबाहेर जात असताना पुन्हा एकदा पोलिस आंदोलकांच्या दिशेने जाऊ लागले. तेव्हा पावटेकर यांनी उपायुक्त गिल्ल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत यांच्या अंगावर बाटलीतून आणलेले पेट्रोल टाकले. यामुळे पोलीस पथक गडबडले. गिल्ल यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलकांची गचांडी पकडत त्यांना मेट्रो स्थानकात सहकाऱ्यांच्या मदतीने ओढत आणले.

उद्दामपणा करणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप देत गाडीत कोंबले. यानंतर सर्वांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आंदोलकांच्या झटापटीत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. सुदैवाने उन्हामुळे किंवा मेट्रोच्या ओव्हरहेड वायरमुळे पोलिसांच्या अंगावरील पेट्रोलने पेट घेतला नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

Previous Post

सांगली ब्रेकींग | मस्ती वाढली, म्हणाले…’तर तुझा संतोष देशमुख करू’..कोणी दिली धमकी ? वाचा सविस्तर, सर्वत्र खळबळ..!

Next Post

बिग ब्रेकिंग | सतेज पाटलांचे पुतणे पृथ्वीराज पाटील यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल:लग्नाचे खोटे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बिग ब्रेकिंग | सतेज पाटलांचे पुतणे पृथ्वीराज पाटील यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल:लग्नाचे खोटे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप..

बिग ब्रेकिंग | सतेज पाटलांचे पुतणे पृथ्वीराज पाटील यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल:लग्नाचे खोटे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group