• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Kolhapur Crime : असहाय्यतेचा फायदा घेऊन दिव्यांग मुलीवर वारंवार अत्याचार; वृद्धाला 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

Admin by Admin
March 8, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
Kolhapur Crime : असहाय्यतेचा फायदा घेऊन दिव्यांग मुलीवर वारंवार अत्याचार; वृद्धाला 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पीडित दिव्यांग अल्पवयीन मुलगी मुलांसोबत खेळत असताना यादवने तिला घरात बोलावून घेत लैंगिक अत्याचार केला होता. वारंवार या मुलीला तो बोलावत होता.

कोल्हापूर : दिव्यांग मुलीच्या (Disabled Girl) असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या दादू नारायण यादव (वय ७०) याला न्यायालयाने (Kolhapur Court) दोषी ठरवले.जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांनी आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. ऑगस्ट २०१९ मध्ये हा प्रकार उघडकीस आला होता.

पीडित दिव्यांग अल्पवयीन मुलगी मुलांसोबत खेळत असताना यादवने तिला घरात बोलावून घेत लैंगिक अत्याचार केला होता. वारंवार या मुलीला तो बोलावत होता. घडला प्रकार मुलीने आईला व चुलतीला सांगितल्यानंतर त्यांनी आरोपीला याबाबत विचारणा केली होती.

यावर तो मुलीच्या घरच्यांना उद्धट उत्तरे देत होता. मुलीच्या घरच्यांनी याबाबत पेठवडगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात बलात्कारासह पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. खटला जिल्हा व सत्र न्यायालयात चालविण्यात आला.

सहायक सरकारी वकील प्रतिभा जयकर-जाधव यांनी एकूण १३ साक्षीदार तपासले. फिर्यादी, पीडित मुलीसह इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. उपनिरीक्षक शरयू देशमुख यांनी सरकारी पक्षाला सहकार्य केले.

Previous Post

हातकणंगले ब्रेकिंग | विनापरवाना खत कारखान्यावर छापा

Next Post

मोठी ब्रेकिंग | खाकीवर हल्ला, टोळक्यानं पोलीस कर्मचाऱ्याची केली हत्या

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | खाकीवर हल्ला, टोळक्यानं पोलीस कर्मचाऱ्याची केली हत्या

मोठी ब्रेकिंग | खाकीवर हल्ला, टोळक्यानं पोलीस कर्मचाऱ्याची केली हत्या

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group