• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

हातकणंगले ब्रेकिंग | विनापरवाना खत कारखान्यावर छापा

Admin by Admin
March 8, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
हातकणंगले ब्रेकिंग | विनापरवाना खत कारखान्यावर छापा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • गोपनीय खबऱ्या | खास प्रतिनिधी

तारदाळ (ता. हातकणंगले) येथे विनापरवाना रासायनिक खत उत्पादन कारखाना उघडकीस आला आहे. पथकाने छापा टाकून 2 लाख 8 हजार 320 रुपयांची डायटोमाईट सिलिकॉन खताची 248 पोती जप्त केली.

जिल्हा परिषदेचे खत निरीक्षक व जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक यांनी सूरगोंडा नेमगोंडा पाटील (रा. समडोळी, जि. सांगली, सध्या रा. इचलकरंजी) याच्याविरोधात शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याबाबतची फिर्याद सुशांत बाजीराव लव्हटे (वय 31, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) यांनी दिली.

सूरगोंडा पाटील हा केमिकल कंपनीतून निवृत्त झाला आहे. त्याने तारदाळ येथील शिवगोंडा महादेव चौगुले याच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये रासायनिक खत उत्पादन सुरू केले. जिल्हा गुणवत्ता निरीक्षक संभाजी शेणवे यांनी 27 फेब-ुवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पंचांसमक्ष या ठिकाणी छापा टाकला. येथे श्री यशोदा केमिकल्स मु. पो. समडोळी (जि. सांगली) यांनी उत्पादित व विक्री केले आहे, अशी मजकूर असलेली भगव्या लालसर रंगाची डायटोमाईट सिलिकॉनची 2 लाख 8 हजार 320 रुपये किमतीची 40 किलो वजनाची 248 पोती आढळून आली. सूरगोंडा पाटील याने 2 फेब-ुवारी 2022 रोजी श्री यशोधन केमिकल या नावे सिलिकॉन खत तयार करण्याच्या व्यवसायाकरिता भाडेकरार केल्याचे निदर्शनास आले.

सूरगोंडा पाटील याने खुलाशामध्ये म्हटले आहे की, खत उत्पादनाचा परवाना 2017 मध्ये उद्योग भवन सांगली येथून घेतला. त्याची मुदत 2022 मध्ये संपली. दरम्यान, खत नियंत्रण आदेशाचे उल्लंघन करून रासायनिक खताचे उत्पादन केले. खत गुणवत्तेबाबत योग्य उपकरणांची प्रयोगशाळाही तयार केली नाही. सूरगोंडा पाटील याने अत्यावश्यक वस्तू अधिनियम कायद्याचा भंग करीत विनापरवाना खत उत्पादन करून शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Previous Post

सांगलीत शिवशाही बसमध्ये तरुणीचा विनयभंग; संशयितास अटक

Next Post

Kolhapur Crime : असहाय्यतेचा फायदा घेऊन दिव्यांग मुलीवर वारंवार अत्याचार; वृद्धाला 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Kolhapur Crime : असहाय्यतेचा फायदा घेऊन दिव्यांग मुलीवर वारंवार अत्याचार; वृद्धाला 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

Kolhapur Crime : असहाय्यतेचा फायदा घेऊन दिव्यांग मुलीवर वारंवार अत्याचार; वृद्धाला 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group