• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत शिवशाही बसमध्ये तरुणीचा विनयभंग; संशयितास अटक

Admin by Admin
March 8, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सांगलीत शिवशाही बसमध्ये तरुणीचा विनयभंग; संशयितास अटक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थातच एमएसआरटीसी (MSRTC) द्वारे चालविण्यात येणारी शिवशाही बस (Shivshahi Bus) सध्या वाद आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. याच बसमध्ये पुणे येथील स्वारगेट बस स्थानक परिसरात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना पुढे आली.

त्यावरुन समाजामध्ये तीव्र संतपा आहे. त्यातच आता पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे. सांगली (Sangli) येथे शिवशाही बसमध्ये एका तरुणीचा विनयभंग (Molestation) झाल्याची तक्रार आहे. एका तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार, वैभव कांबळे नामक तरुणास पोलीस आणि नागरिकांनी पकडून पोलीस स्टेशनला नेले आहे. दरम्यान, सदर व्यक्तीस नागरिकांनी मारहाण केल्याचे समजते.
रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा

मुळची कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एका गावची रहिवासी असलेली 24 वर्षीय तरुणी नोकरी/व्यवसाय निमित्त पुणे येथे वास्तव्यास आहे. काही कारणांनी ती तिच्या मूळ गावी निघाली होती. त्यासाठी तिने स्वारगेट बस स्थानकावरुन शिवशाही बस घेतली. रात्रीच्या सुमारास ही बस इस्लापपूर बस स्थानकात आली असता एक संशयित व्यक्ती बसमध्ये चढला. त्याने बसण्यासाठी तरुणीच्या पाठीमागचे आसन निवडले. बस सुरु झाली. दरम्यान, बस आष्ठा मार्गे सांगलीला येत असताना रात्री 11.00 वाजणेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन या व्यक्तीने तरुणीस खिडकीकडील बाजूने अश्लील स्पर्श करण्यास सुरु केले.

संशयित आरोपीस नागरिकांकडून चोप

तरुणीने सुरुवातीला दुर्लक्ष केले मात्र त्याने तिला अधिकच त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर तरुणीने या घटनेची माहिती वाहकास दिली आणि बस स्टँडला येताच जोराचा आरडाओरडा सुरु केला. त्यानंतर स्डँडवर उपस्थित इतर नागरिक आणि प्रवाशांनी घटनेची दखल घेतली. दरम्यान, अंधार आणि गोंधळाचा फायदा घेत हा व्यक्ती पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, प्रवाशांनी त्यास पकडले आणि मारहाण करुन पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेत पोलीस स्टेशनला नेत त्यावर कायदेशीर कारवाई सुरु केली. चौकशीदरम्यान, सदर व्यक्तीचे नाव वैभव कांबळे असल्याचे पुढे आले.

स्वारगेट बस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या आणि नादुरुस्त असल्याने सेवेत नसल्याने बाजूला उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. ही घटना घडल्यावर समाजातून तीव्र संताप व्यक्त होत होता. त्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले. पोलीस प्रशासनास सूचना आदेश गेले आणि काही तास चालवलेल्या अथक तपास आणि शोध मोहिमेनंतर आरोपीस अटक करण्यात आली. तेव्हापासून शिवशाही बस वाद आणि चर्चेच्या केंद्रस्थानी असतानाच सांगली येथील घटना पुढे आली आहे.

अन्याय अत्याचाराविरोधा माहिती आणि मदत

महिला आणि लहान मुले यांच्यावरील कोणत्याही प्रकारच्या अन्याय, अत्याचार यांची तक्रार करण्यासाठी आणि मदत मिळवण्यासाठी सेवा उपलब्ध असतात. फक्त आपण तिथपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते.

  • स्वत:बद्दल किंवा पीडिताबद्दल माहिती देणे
    आणि मदत मिळविणे यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवा:

महिला आणि बाल हेल्पलाइन क्रमांक :

चाइल्डलाइन इंडिया: 1098

हरवलेली मुले आणि महिला: 1094

महिला हेल्पलाइन: 181

महिला हेल्पलाइनसाठी राष्ट्रीय आयोग: 112

राष्ट्रीय महिला आयोग हिंसेविरुद्ध हेल्पलाइन: 7827170170

महिला आणि ज्येष्ठ नागरिक पोलीस हेल्पलाइन: 1091/1291

Previous Post

तासगाव-सांगली मार्गावर अपघात; दोघा दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू

Next Post

हातकणंगले ब्रेकिंग | विनापरवाना खत कारखान्यावर छापा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
हातकणंगले ब्रेकिंग | विनापरवाना खत कारखान्यावर छापा

हातकणंगले ब्रेकिंग | विनापरवाना खत कारखान्यावर छापा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group