• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत हॉटेलवर दगडफेक, टोळक्याचा धिंगाणा हॉटेलमधील ‘सीसीटीव्ही’ कॅमेरात कैद…

Admin by Admin
May 6, 2022
in क्राईम
1 min read
0
सांगलीत हॉटेलवर दगडफेक, टोळक्याचा धिंगाणा हॉटेलमधील ‘सीसीटीव्ही’ कॅमेरात कैद…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली: खबऱ्या प्रतिनिधी/ विश्रामबाग येथील हॉटेल ‘अजवा’वर बुधवारी रात्री पाचजणांच्या टोळक्याने दगडफेक केली. फ्रीजसह अन्य साहित्यांची मोडतोड केली. टोळक्याचा धिंगाणा हॉटेलमधील ‘सीसीटीव्ही’ कॅमेरात कैद झाला आहे.

पाचजणांचे टोळके रात्री दहा वाजता हॉटेलमध्ये ‘शोरमा’ खाण्यास गेले होते. ते दारूच्या नशेत होते. त्यांनी फुकट शोरमा खाण्यास मागितला.

हॉटेल मालक महम्मद सादीक शब्बीरअली देवजानी यांनी ‘फुकट काही मिळणार नाही’, असे सांगितले. यावरून टोळक्याने त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर त्यांनी पैसे देऊन शोरमा घेतला. खाऊन ते निघूनही गेले. पुन्हा रात्री साडेदहा वाजता ते आले. त्यांनी थेट हॉटेलवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. हॉटेलबाहेर फ्रीज होता. त्याची तोडफोड केली. हॉटेलच्या काचा फोडल्या.

यामध्ये पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर देवजानी यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासले. यात हल्ला करणारे पाच संशयित दिसत आहेत. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे. त्याआधारे संशयितांची नावे निष्पन्न करण्याचे काम सुरू आहे. येत्या एक-दोन दिवसात त्यांना अटक करण्यात यश येईल, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी सांगितले.

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण…

Next Post

आष्टा पोलिसांनी जीवे मारण्याचा केला प्रयत्न, अंगावर घातली गाडी..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आष्टा पोलिसांनी जीवे मारण्याचा केला प्रयत्न, अंगावर घातली गाडी..?

आष्टा पोलिसांनी जीवे मारण्याचा केला प्रयत्न, अंगावर घातली गाडी..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group