• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

‘मी तरुणीवर अत्याचार केला नाही, आमचे संबंध सहमतीने.’; दत्ता गाडेचा पोलिसांसमोर धक्कादायक दावा

Admin by Admin
February 28, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
‘मी तरुणीवर अत्याचार केला नाही, आमचे संबंध सहमतीने.’; दत्ता गाडेचा पोलिसांसमोर धक्कादायक दावा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पुण्यात (Pune News) स्वारगेट बसस्थानकावर तरूणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी आज मध्यरात्री अटक केलीय.

त्याला दुपारी न्यायालयात हजर देखील केलं जाणार आहे. त्याअगोदर मात्र दत्ता गाडेने पोलिसांसमोर एक धक्कादायक दावा (Swarget Rape Case) केलाय. त्यामुळे प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाल्याचं समोर येतंय. दत्ता गाडेच्या या दाव्यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे.

अटक केल्यानंतर दत्ता गाडे (Datta Gade) याला लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आलंय. तिथं आरोपीची कसून चौकशी केली जातेय. तर पोलीस कोठडीतच दत्ता गाडे याने टाहो फोडल्याची माहिती मिळते. माझं चुकलंय. मी पापी आहे, असं म्हणत दत्ता गाडे रडत असल्याचं समोर आलंय. मी तरूणीवर अत्याचार केलेला नाहीये. आमचे संबंध सहमतीने झाले, असा दावा देखील दत्ता गाडेने पोलिसांसमोर केलाय, असं सांगण्यात येत आहे.

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीने तरूणीवर बलात्कार केला नाही, तर संबंध संमतीने झाल्याची कबुली दिलीय. यामुळे आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट येण्याची दाट शक्यता आहे. पीडीत तरूणी आणि आरोपी हे पूर्वीपासूनच एकमेकांना ओळखत होते का? हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. जर दत्ता गाडे खरं बोलत असेल तर पिडीत तरूणी आरोपीवर असे खाेटे आरोप का करत आहे, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय.

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास बेड्या ठोकल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. परंतु, दत्ता गाडेचा मोबाईल बंद असल्यामुळे शोध मोहिमेमध्ये अडथळा येत होता. अखेर दत्तात्रय गाडेला शिरुर तालुक्यातील गुनाट या गावातून अटक केल्याचं समोर आलंय. त्याला शोधण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा देखील वापर केला गेलाय.

Previous Post

स्वारगेट बलात्कार केस; पोलिसांनी तरुणाला ताब्यातही घेतलं, मात्र, तो आरोपी नसून त्याच्यासारखाचं.

Next Post

DCP-SP Transfer : महाराष्ट्रातील 13 बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या तडाफडकी बदल्या; पोलीस दलात खळबळ

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
DCP-SP Transfer : महाराष्ट्रातील 13 बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या तडाफडकी बदल्या; पोलीस दलात खळबळ

DCP-SP Transfer : महाराष्ट्रातील 13 बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या तडाफडकी बदल्या; पोलीस दलात खळबळ

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group