Saturday, June 7, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकींग | प्रशासनाचा अजब कारभार..! देवा तुला शोधू कुठं? थेट देवाला पाठवली नोटीस, नागरिक मात्र संतप्त..!

Admin by Admin
February 28, 2025
in पश्चिम महाराष्ट्र
0
सांगली ब्रेकींग | प्रशासनाचा अजब कारभार..! देवा तुला शोधू कुठं? थेट देवाला पाठवली नोटीस, नागरिक मात्र संतप्त..!

सांगली प्रतिनिधी – गोपनीय खबऱ्या | सांगलीत अजब प्रकार घडला आहे. सांगली शहरातील म्हसोबा मंदिराला महापालिकेकडून घरपट्टीची नोटीस पाठवण्यात आली आहे. या मंदिराच्या नावे घरपट्टी भरण्याची नोटीस बजावण्यात आल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.महापालिकेच्या या कृत्येने नागरिक संतप्त झाले आहेत.

नुकतंच सांगली महापालिका क्षेत्रामध्ये वाढीव घरपट्टी लादण्याचा निर्णय घेण्यात आला. ड्रोनद्वारे सर्वेक्षण करुन घरपट्टी देण्यात आली. या सर्वेक्षणाद्वारे सांगली शहरातील खणभाग येथील म्हसोबा गल्लीमधील म्हसोबा मंदिराला घरपट्टी भरण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. मंदिराच्या नावाने दिलेले घरपट्टी बिल कोण भरणार? आता देवाला कर भरावा लागणार का? घरपट्टी वसुलीबाबत महापालिका काय भूमिका घेणार? असे प्रश्न विचारले जात आहेत.

सांगली महापालिकेच्या या अजबगजब कारभाराबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या मंदिराला ड्रोनद्वारे सर्वेक्षण करुन नोटीस बजावण्यात आली आहे. महानगरपालिकेने देवालाही सोडले नसल्याचे लोक म्हणत आहेत. घरपट्टीच्या विरोधात जनआंदोलन उभे करुन कायदेशीर लढाई लढणार असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

महापालिकेने ड्रोनद्वारे शहरात सर्व्हे केला आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन नागरिकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये तब्बल २९ हजार प्रॉपर्टी निदर्शनास आले आहेत. ज्या घरांची नोंदणी नाही, अशांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. पण देवाच्या मंदिराला नोटीस पाठवल्याने खळबळ उडाली आहे.

Previous Post

धक्कादायक ब्रेकींग | मिरजेत तलवारीने गुन्हेगारास भोकसले

Next Post

स्वारगेट बलात्कार केस; पोलिसांनी तरुणाला ताब्यातही घेतलं, मात्र, तो आरोपी नसून त्याच्यासारखाचं.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
स्वारगेट बलात्कार केस; पोलिसांनी तरुणाला ताब्यातही घेतलं, मात्र, तो आरोपी नसून त्याच्यासारखाचं.

स्वारगेट बलात्कार केस; पोलिसांनी तरुणाला ताब्यातही घेतलं, मात्र, तो आरोपी नसून त्याच्यासारखाचं.

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014