• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत महिला तलाठ्याला सुटली पैश्यांची हाव, अँटीकरप्शनने जागीच घातला अटकेचा घाव..!

राजापूर येथे दोन हजारांची लाच मागणार्‍या महिला तलाठ्यावर गुन्हा

Admin by Admin
February 16, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
महाराष्ट्र शासन साजरा करतेय वर्षभर ‘व्हॅलेंटाईन डे’ ! शासनाचे ‘त्या’ 482 अधिकारी, कर्मचारी यांच्यावर विशेष ‘प्रेम’; ‘अँटी करप्शन’च्या कारवाईनंतरही खुर्चीवर टिकून, शिक्षा झाल्यानंतरही 20 अधिकारी, कर्मचाऱ्यांना केले नाही अजूनही ‘बडतर्फ’
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जमिनीची नोंद करण्यासाठी मंडल अधिकार्‍याच्या नावाने दोन हजार रुपयांची लाच मागणार्‍या राजापूर (ता. तासगाव) येथील महिला तलाठ्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

सुजाता अण्णाप्पा जाधव (रा. वारणा प्रेस्टिज अपार्टमेंट, वारणाली, सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या महिला तलाठ्याचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, सुजाता जाधव ही राजापूर (ता. तासगाव) येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे. तक्रारदारांनी तिच्या भावाकडून राजापूर हद्दीतील जमीन खरेदी केली होती. या जमीन खरेदी दस्ताची नोंद सात-बारापत्रकी करण्यासाठी तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार दि. 11 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीत जाधव हिने मंडल अधिकार्‍याच्या नावे दोन हजार व स्वतःसाठी एक हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती मंडल अधिकार्‍यांसाठी दोन हजार लाचेची मागणी पंचांसक्षम केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाधव हिच्याविरोधात तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे तासगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

ही कारवाई उपअधीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक विनायक भिलारे, अंमलदार सीमा माने, अजित पाटील, प्रीतम चौगुले यांच्या पथकाने केली. अधिक तपास निरीक्षक विनायक भिलारे करीत आहेत.

Previous Post

मिरजेत टेम्पोला धडकल्याने दुचाकीस्वार जागीच ठार

Next Post

शासकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी प्रयत्न करू – मंत्री हसन मुश्रीफ

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शासकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी प्रयत्न करू – मंत्री हसन मुश्रीफ

शासकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी प्रयत्न करू - मंत्री हसन मुश्रीफ

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group