• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | सांगली एलसीबीची कारवाई, ई-सिगारेट’चा साठा जप्त

Admin by Admin
February 14, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | सांगली एलसीबीची कारवाई, ई-सिगारेट’चा साठा जप्त
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली शहरातील गजबजलेल्या मारुती रस्त्यावरील दुकानातून बंदी असलेल्या १६ हजार रुपये किमतीच्या आठ ‘ई-सिगारेट’ एलसीबीच्या पथकाने जप्त करत नशाबाजाराला आणखी एक दणका दिला. लखन चंद्रकांत मंगलानी (वय ३५, रा.लोंढे कॉलनी, मिरज) या संशयित विक्रेत्याचे नाव आहे.

सांगलीतील नशाबाजाराविरोधात पृथ्वीराज पवार यांनी प्रश्‍न उपस्थित करत आवाज उठवला. त्यानंतर अधीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखाली कारवाईचा धडाका सुरू झाला. त्यात गांजा, ड्रग्जसह इंजेक्शनचा साठा जप्त केला. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गांभीर्याने दखल घेत नशेखोरीची साखळी मोडीत काढण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना केली. त्या माध्यमातून कारवाईचा धडका सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी शहरातील एका उद्यानात खुलेआमपणे अल्पवयीन मुले धूर काढत असल्याचा व्हिडिओ समोर आले. भाजपचे नेते पृथ्वीराज पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर पोलिसांनी सर्वत्र छापेमारी करण्यास सुरुवात केली. आरोग्यास हानिकारक असलेल्या तंबाखूजन्य सिगारेटला पर्याय म्हणून निकोटिनच्या ‘ई-सिगारेट’चे मार्केटिंग केले जात असले, तरी शासनाने त्यावर बंदी घातली आहे. मात्र, या ई-सिगारेटचा धूर सांगलीत सर्रास काढला जात असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने गेल्या दोन दिवसांपासून टपऱ्यांसह संशयित दुकानांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, मारुती रस्त्यावरील ‘ऊँ बेल्टस अँड नॉव्हेल्टी’ दुकानात ‘ई – सिगारेट’ची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी काल रात्री दुकानात छापा टाकून तपासणी केली.

त्यावेळी काउंटरनजीक असलेल्या एका बॉक्समध्ये आठ ‘ई-सिगारेट’ची पाकिटे मिळून आली. त्या संदर्भात विचारणा केली असता त्याने ‘ई-सिगारेट’ एका वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन मागविल्या असल्याचे सांगितले. सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

संशयित दुकानचालक लखन मंगलानी याच्यावर ‘प्रोव्हिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगारेट ॲक्ट’ २०१९ अन्वये सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक नितीन सावंत, इम्रान मुल्ला, अमोल ऐदाळे, संकेत मगदूम, विनायक सुतार, सोमनाथ पतंगे यांच्या पथकाने कारवाई केली.

सिगारेटला बंदी का

राज्यात निकोटिन असलेल्या ‘ई-सिगारेट’ची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे आढळले आहे. ‘ई-सिगारेट’मध्ये निकोटिन हे घटकद्रव्य आहे. त्याला औषध नियंत्रकांनी मान्यता दिलेली नाही. त्यामुळे ई-सिगारेटवर बंदी आहे. विविध प्रकारच्या ई-सिगारटेचे सेट पाचशे ते दोन हजार रुपयांपर्यंत मिळू लागले आहेत. त्यात पाईप, निकोटिन कार्टेज, बॅटरीचा समावेश असतो.

नशेखोरीचा बाजार मोडीत काढण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार बंदी असलेल्या ‘ई-सिगारेट’वर कारवाई करण्यात आली आहे. इथून पुढेही पथकांमार्फत तपासणी करण्यात येणार असून याची विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. तसेच नागरिकांना कोठेही आक्षेपार्ह गोष्टी निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.”

– सतीश शिंदे, निरीक्षक एलसीबी

Previous Post

दुःखद बातमी | भारती विद्यापीठाचे मानद संचालक डॉ. हणमंतराव कदम यांचे निधन

Next Post

मोठी बातमी! खरेदी-विक्रीसाठी आता नसणार दुय्यम निबंधक कार्यालयाचे बंधन; 7/12 वरील लोक कोठेही असले तरी दस्त नोंदणीत सहभागी होता येणार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी! खरेदी-विक्रीसाठी आता नसणार दुय्यम निबंधक कार्यालयाचे बंधन; 7/12 वरील लोक कोठेही असले तरी दस्त नोंदणीत सहभागी होता येणार

मोठी बातमी! खरेदी-विक्रीसाठी आता नसणार दुय्यम निबंधक कार्यालयाचे बंधन; 7/12 वरील लोक कोठेही असले तरी दस्त नोंदणीत सहभागी होता येणार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group