• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दुःखद बातमी | भारती विद्यापीठाचे मानद संचालक डॉ. हणमंतराव कदम यांचे निधन

Admin by Admin
February 14, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
दुःखद बातमी | भारती विद्यापीठाचे मानद संचालक डॉ. हणमंतराव कदम यांचे निधन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल सांगली येथील मानद संचालक डॉ. हणमंतराव मोहनराव कदम (वय 60) यांचे आज, शुक्रवारी (दि. 14) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. माजी आमदार मोहनराव कदम यांचे ते पुत्र तर माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांचे ते चुलत बंधू व युवा नेते डॉ जितेश कदम यांचे ते वडील होते.

त्यांच्या निधनाने भारती विद्यापीठ परिवारासह कडेगांव पलूस मतदारसंघ व सांगली शहरासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

डॉ हणमंतराव कदम यांचे भारती विद्यापीठाच्या शैक्षणिक क्षेत्रात तसेच सांगली येथ भारती हॉस्पिटल मध्ये मोठे योगदान राहिले आहे. भारती परिवाराच्या आजवरच्या वाटचालीत त्यांचा सहभाग अतिशय मोलाचा राहिला आहे. अतिशय मितभाषी, कार्यतत्पर आणि दांडगा लोकसंपर्क ठेऊन त्यांनी भारती परिवाराचा वसा व वारसा जपला होता.

आज दुपारी दोन वाजता त्यांच्यावर मूळगावी सोनसळ तालुका कडेगांव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, राजकीय स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. मागील अनेक वर्षांपासून ते भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल सांगली येथे मानद संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Previous Post

इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्तपदी पल्लवी पाटील, दिवटे मॅटमध्ये गेल्याने नियुक्तीला मिळाली होती स्थगिती

Next Post

ब्रेकिंग | सांगली एलसीबीची कारवाई, ई-सिगारेट’चा साठा जप्त

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | सांगली एलसीबीची कारवाई, ई-सिगारेट’चा साठा जप्त

ब्रेकिंग | सांगली एलसीबीची कारवाई, ई-सिगारेट'चा साठा जप्त

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group