• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

करजगी बालिका अत्याचार प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल

Admin by Admin
February 8, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय, सामाजिक
1 min read
0
करजगी बालिका अत्याचार प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी पाठपुरावा करणार -महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर

  • – ⁠करजगी घटनेचा घेतला आढावा
  • – पीडितेच्या कुटुंबाला दिला धीर
  • – ⁠पीडितेच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची ग्वाही

सांगली प्रतिनिधी | जत तालुक्यातील करजगी येथील बालिका अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा मिळण्यासाठी पाठपुरावा करू. पीडितेच्या कुटुंबियांना मनोधैर्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देऊ, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज केले. करजगी येथील घटनेच्या पार्श्वभूमिवर पोलीस स्थानक, उमदी येथे बैठक घेऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतल्यानंतर त्या बोलत होत्या.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) संदीप यादव, प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुरेंद्र बेंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, प्रभारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे, बाल विकास प्रकल्प अधिकारी शकुंतला निकम, जिल्हा चाईल्ड लाईन कक्षाच्या समन्वयक आदि उपस्थित होते.

यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या, करजगी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना अत्यंत निर्दयी, माणुसकीला काळिमा फासणारी व वेदनादायी असून, या घटनेचा निषेध करते. या प्रकरणी अत्यंत कमी कालावधीत पंधरा दिवसात दोषारोपपत्र दाखल केले जाईल, असे त्या म्हणाल्या.

घटनेचा आढावा घेतल्यानंतर श्रीमती चाकणकर यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच, पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला.

Previous Post

ब्रेकिंग | एमडी ड्रग्जसाठी वापरलेला कच्चा माल जप्त, तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ

Next Post

पुण्यात धिंड पॅटर्न, आरोपीने जेलमधून सुटल्यानतर काढली रॅली, पोलिसांनी त्याच ठिकाणी काढली वरात

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पुण्यात धिंड पॅटर्न, आरोपीने जेलमधून सुटल्यानतर काढली रॅली, पोलिसांनी त्याच ठिकाणी काढली वरात

पुण्यात धिंड पॅटर्न, आरोपीने जेलमधून सुटल्यानतर काढली रॅली, पोलिसांनी त्याच ठिकाणी काढली वरात

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group