• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेतील गांधी चौक पोलिसांनी ‘या’च्या घरावर टाकला छापा : तर थेट उत्तरप्रदेशमधून मुख्य सूत्रधार उचलला : आत्तापर्यंत १३ जणांना केली अटक..

नशेसाठी इंजेक्शनचे उत्तरप्रदेश कनेक्शन उघड

Admin by Admin
February 7, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेतील गांधी चौक पोलिसांनी ‘या’च्या घरावर टाकला छापा : तर थेट उत्तरप्रदेशमधून मुख्य सूत्रधार उचलला : आत्तापर्यंत १३ जणांना केली अटक..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

 नशेखोरांचा बाजार उठवण्यासाठी सांगली पोलिसांनी शपथ घेतली असून अंमली पदार्थ विकणारे, नशेसाठी लागणारी सामुग्री किंवा गोळ्या औषध विक्री करणारे यासह अवैध धंदे करणारे आणि त्यांना पाठबळ देणारे… या साऱ्यांचे धाबे दणाणले असून अवैध धंद्याना पाठिंबा देणाऱ्या राजकारण्यांची सुद्धा झोप उडाल्याचे पाहायला मिळत आहे. 

नशेसाठी वापरण्यात येणार्‍या मेफेन्टरमाइन इंजेक्शनचा पुरवठा उत्तर प्रदेशाच्या मुरादाबादमधून होत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिसांनी उत्तर प्रदेशात सापळा रचून मुख्य पुरवठादाराच्या मुसक्या आवळल्या.

इंतजार अली जहीरुद्दीन (वय 25, रा. खलीलपूर, ता. कांठ, जि. मुरादाबाद) असे संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलिस कोठडी दिली आहे.

याबाबत माहिती अशी, महात्मा गांधी चौक पोलिसांनी 20 जानेवारी रोजी मिरजेतील उद्यानाजवळ नशेसाठी इंजेक्शन व गोळ्या विक्री करण्यासाठी आलेल्या ओंकार मुळे व रोहित कागवाडे या दोघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून अशपाक बशीर पटवेगार याचे नाव निष्पन्न झाले. पटवेगार हा केमिस्ट असून त्याच्या घरावर छापा टाकून नशेसाठी वापरण्यात येणारी इंजेक्शन्स व गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला. पोलिसांनी तिघांकडून 14 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता. तीनही संशयितांच्या चौकशीत सांगली, कोल्हापूर, सातारा व सोलापूर या जिल्ह्यातील एजंटांची माहिती मिळाली होती. पोलिसांनी आठ एजंटांना जेरबंद केले.

मुख्य संशयित अशपाक पटवेगार याच्या चौकशीत त्याने उत्तर प्रदेशातील मुरदाबाद येथील इंतजार अली जहीरूद्दीन याच्याकडून काळ्या बाजारातून अवैध मार्गाने मेफेन्टरमाइन इंजेक्शन मागवून महाराष्ट्रात वितरण करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर महात्मा गांधी चौक पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशातील मुरादाबादला रवाना झाले. मुख्य सूत्रधार इंतजार अली जहीरुद्दीन याला ताब्यात घेऊन मिरजेत आणले. मिरज न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे करीत आहेत.

  • आतापर्यंत १३  जणांना अटक

याप्रकरणी 13 जणांना अटक करण्यात आली. यात सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा या जिल्ह्यातील आठ एजंटाचाही समावेश आहे. रोहित कागवाडे (रा. सांगली), ओंकार मुळे (रा. सांगली), अशपाक पटवेगार (रा. सांगली), वैभव ऊर्फ प्रशांत पाटोळे (रा. कडेगाव), ऋतुराज भोसले (सांगलीवाडी), अमोल मगर, साईनाथ वाघमारे, अविनाश काळे, देवीदास घोडके (सर्व रा. माळशिरस), आकाश भोसले (रा. माण), हनुमंत शिंदे (रा. माळशिरस), ललित पाटील (रा. शाहुवाडी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; राज्यात शेत जमिनीच्या वापरासाठीची ‘NA’ अट रद्द

Next Post

गुंठ्यांमध्ये जमीन खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌ गुंठेवारी खरेदी-विक्रीस मिळवा परवानगी!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
गुंठ्यांमध्ये जमीन खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌ गुंठेवारी खरेदी-विक्रीस मिळवा परवानगी!

गुंठ्यांमध्ये जमीन खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌ गुंठेवारी खरेदी-विक्रीस मिळवा परवानगी!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group