• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेतून ‘गुरुजी’ पोलिसांच्या ताब्यात ; एलसीबीची कारवाई.!

Admin by Admin
December 13, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरजेतील म्हैसाळ रस्त्यावरील उड्डाणपूल आणि मार्केट यार्डातील शेतकरी भवन गांजा विक्रीसाठी आलेल्या खालिद रियाज मोमीन (वय ३३, रा. अमर टॉकीजसमोर, ख्वॉजा झोपडपट्टी, मिरज), हुसेन ऊर्फ ‘गुरुजी’ मैनुद्दीन मुल्ला (वय ४९, रा.अमननगर, मालगाव रस्ता, मिरज), हुसेन बादशहा सय्यद या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. तर मौला हसन टेमकर (रा. बिस्मिल्ला कॉलनी, मिरज), संदीप रास्ते (रा. विसापूर, ता. तासगाव) हे दोघे पसार आहेत. कारवाईत तीन किलो गांजासह ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.

गांजासह अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले आहे. त्यानुसार निरीक्षक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खास पथके तयार करण्यात आली आहे. पथकातील कर्मचारी अनंत कुडाळकर यांना खालिद मोमीन हा म्हैसाळ रस्ता उड्डाणपुलाजवळ गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन सापळा रचला.

थोड्याच वेळात खालीद तेथे आला. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली. त्याच्याकडे हिरवट-काळपट रंगाचा फुलबोंडे असलेला २ किलो ९४ ग्रॅम वजनाचा गांजा आढळला. त्याने मौला टेमकर व हुसेन मुल्ला या दोघांनी विक्रीसाठी दिल्याची कबुली दिली.

दरम्यान, गुन्हे अन्वेषणकडील कर्मचारी सोमनाथ पतंगे यांना हुसेन सय्यद हा मिरज मार्केट यार्डातील शेतकरी भवनजवळ गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिलाली. त्यानुसार पथकाने सापळा रचला.

हुसेन सय्यद आल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे ८६४ ग्रॅम गांजा मिळाला. गांजा कोठून आणला याची चौकशी केल्यानंतर त्याने संदीप रास्ते याच्याकडून गांजा आणल्याची कबली दिली. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Previous Post

अजित पवारांनी सहकुटुंब घेतली शरद पवारांची भेट:पवारांच्या ८५ व्या वाढदिवसाचे निमित्त; प्रफुल्ल पटेल, भुजबळ, तटकरेही होते सोबतीला..

Next Post

मंत्रिमंडळ विस्तार उपराजधानीत होणार, ४० बंगले सुसज्ज करण्याचे आदेश; संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मंत्रिमंडळ विस्तार उपराजधानीत होणार, ४० बंगले सुसज्ज करण्याचे आदेश; संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर

मंत्रिमंडळ विस्तार उपराजधानीत होणार, ४० बंगले सुसज्ज करण्याचे आदेश; संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group