Friday, June 6, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अजित पवारांनी सहकुटुंब घेतली शरद पवारांची भेट:पवारांच्या ८५ व्या वाढदिवसाचे निमित्त; प्रफुल्ल पटेल, भुजबळ, तटकरेही होते सोबतीला..

Admin by Admin
December 12, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय, विशेष
0
अजित पवारांनी सहकुटुंब घेतली शरद पवारांची भेट:पवारांच्या ८५ व्या वाढदिवसाचे निमित्त; प्रफुल्ल पटेल, भुजबळ, तटकरेही होते सोबतीला..

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. सध्या शरद पवार हे दिल्लीत असून दिल्लीतील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार जाणार का? याची कालपासून चर्चा होती. मात्र, हे सर्व नेते दिल्लीत असल्यामुळे अजित पवार शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी जातील, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार अजित पवार हे शरद पवार यांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांसह इतर सर्व नेत्यांचे स्वागत केले. विधानसभा निवडणुकीनंतर पहिलीच भेट विविध पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली आहे. इतकेच नाही तर अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे देखील शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी पवारांच्या घरी पोहोचले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांनतर अजित पवार आणि शरद पवार यांची ही पहिलीच भेट आहे.

आमची नेहमीप्रमाणे चर्चा –

अजित पवार शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर या सर्व नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. मात्र, आमची राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. परभणी येथील प्रकरण, राज्यसभेतील चर्चा आदी जनरल विषयावर आमच्यात चर्चा झाली असल्याचे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवार यांचा आर्शीवाद घेण्यासाठी आलो असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. आज शरद पवार तर उद्या काकींचा वाढदिवस असतो. त्यामुळे त्यांचे आर्शीवाद घेतले असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

  • दरवर्षी येतो, तसे याही वर्षी आलो – छगन भुजबळ

शरद पवार यांच्यासोबत आम्ही गेली अनेक वर्षे काम करत आहोत. तेव्हापासून दरवर्षी आम्ही शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येतो. त्यात खंड पडू देणार नाही. तसे या वर्षी देखील शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. राजकारण हे राजकारणाच्या जागी असते. शरद पवार यांच्या विषयी आमच्या मनात अजूनही प्रेम आणि आदर कायम असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

  • आमच्या कुटुंबाने पातळी सोडली नाही – पवार

अजित पवार आणि शरद पवार यांची भेट ही कौटुंबिक होती. आमच्या कुटुंबाने कायमच राजकारण वेगळे ठेवले असल्याचे युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे. आम्ही एकमेकांविरोधात कधीही खालच्या पातळीवर टीका केली नसल्याचेही युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे.

Previous Post

मोठी बातमी | डॉ. सुरेशभाऊ खाडेंचा मंत्री मंडळात समावेश निश्चित ..!

Next Post

मिरजेतून ‘गुरुजी’ पोलिसांच्या ताब्यात ; एलसीबीची कारवाई.!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

मिरजेतून 'गुरुजी' पोलिसांच्या ताब्यात ; एलसीबीची कारवाई.!

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014