• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, भाजपकडे केली सर्वात मोठी मागणी

Admin by Admin
November 27, 2024
in राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, भाजपकडे केली सर्वात मोठी मागणी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

Maharashtra l महाराष्ट्रात महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. परंतु, निकालानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार हा एकच प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न करुन भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच आता एकनाथ शिंदेंनी एक गुगली टाकली आहे.

महायुतीपुढे नवा पेच निर्माण :
सत्तास्थापनेला वेग आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्यालाच पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी जोरदार धरला असून भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यावेळी 137 आमदारांचे पाठबळ असलेल्या भाजपने हा दबाव झुगारुन देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असा स्पष्ट संदेश एकनाथ शिंदे यांना दिला आहे. मात्र या सर्व घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीमधून माघार घेतल्यानंतर त्यांनी एक गुगली टाकल्यामुळे महायुतीपुढे पुन्हा नवा पेच निर्माण झाला आहे.

भाजप पक्षाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या मोबदल्यात केंद्रात महत्वाचं खात किंवा राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर देखील दिली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या या दोन्ही ऑफर्स नाकारल्या आहेत. त्याऐवजी एकनाथ शिंदे यांनी राज्यात एक नवा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला आहे.

एकनाथ शिंदेंच्या प्रस्तावर भाजपची प्रतिक्रिया काय? :

यावेळी एकनाथ शिंदे यांनी, राज्यात मला पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर मला महायुती सरकारचा संयोजक हे पद मला द्यावे. कारण राज्यातील विधानसभा निवडणूक ही माझ्या नेतृत्त्वाखाली लढवण्यात आली असल्याचं एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. याशिवाय खासदार श्रीकांत शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी देखील एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या या मागणीने भाजप आणि महायुतीचे दिग्गज नेते पुन्हा एकदा बुचकाळ्यात पडले आहेत. त्यामुळे आता भाजपने अद्याप या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच याबाबत भाजपच्या वर्तुळात अद्यापही खलबत सुरु असून त्यामुळेच महायुती सरकारच्या शपथविधीला उशीर होत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Previous Post

मोठी बातमी! नाना पटोले यांचा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

Next Post

मोठी ब्रेकिंग | सांगलीत चोरट्यांचा दांडगा डाव..? बँकेत चोरीच्या प्रयत्नाने खळबळ..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीत चोरट्यांचा दांडगा डाव..? बँकेत चोरीच्या प्रयत्नाने खळबळ..!

मोठी ब्रेकिंग | सांगलीत चोरट्यांचा दांडगा डाव..? बँकेत चोरीच्या प्रयत्नाने खळबळ..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group