• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | मतदान बूथ पाहणीसाठी निघालेल्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, बेशुद्धावस्थेत रुग्णालयात केलं दाखल

Admin by Admin
November 20, 2024
in क्राईम, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

स्वराज्य पक्षाचे जळगाव-जामोदचे उमेदवार प्रशांत डिक्कर हे आपल्या सहकाऱ्यासमवेत आज मतदानाच्या निमित्ताने बूथ पाहणी करीता पहाटे शेगाव कडे येण्यास निघाले होते.

यावेळी दुचाकीवरून आलेल्या पाच ते सात गुंडांनी त्यांची गाडी अडवली व गाडीवर दगडफेक सुरू झाली. या घटनेने जळगावमध्ये खळबळ उडाली आहे

धारधार शस्त्रांनी त्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात प्रशांत डिक्कर व त्यांचे सहकारी चालक गंभीर जखमी झाले असून याचवेळी प्रशांत डिक्कर यांना हृदविकाराचा तीव्र झटका येऊन ते अद्यापही बेशुद्धावस्थेत आहेत. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असून पुढील उपचारांसाठी त्यांना अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

डिक्कर समर्थकांकडून हा हल्ला राजकिय विरोधक गुंडानी केला असल्याचे सांगितले जात आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी डिक्कर यांच्यासाठी ३ सभा १ रॅली घेतली होती. त्यावेळी उमेदवारासह संभाजीराजेंनी देखील याभागातिल दहशती विषयी चिंता व्यक्त केली होती. आज मतदानादिवशी हा हल्ला झाल्याने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील उमेदवार प्रशांत डिक्कर यांना निवडणूक प्रक्रिया राबवण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. या हेतुने हा हल्ला झाला असु शकतो.

संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया..

एक विस्थापित भूमिहीन शेतमजुराचा मुलगा, शेतकरी चळवळीतील सामान्य कार्यकर्ता प्रथापितांसमोर मोठे आव्हान उभे करतो आणि विजयाची वाट धरतो, हे माजलेल्या प्रस्थापित आमदाराला पाहवले नाही. लोकशाही पद्धतीने आपला पराभव दिसत असल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या स्थानिक आमदाराने हा भ्याड हल्ला घडवून आणलेला आहे. हा माज आम्ही उतरवू

Previous Post

सांगली ब्रेकिंग | विना नंबरची गाडी पकडण्यावरून गोंधळ; पडळकरांकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप

Next Post

ब्रेकिंग | शिवसेनेच्या उमेदवारावर गोळीबार, ५ जणांनी झाडल्या गोळ्या, सर्वत्र खळबळ

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | शिवसेनेच्या उमेदवारावर गोळीबार, ५ जणांनी झाडल्या गोळ्या, सर्वत्र खळबळ

ब्रेकिंग | शिवसेनेच्या उमेदवारावर गोळीबार, ५ जणांनी झाडल्या गोळ्या, सर्वत्र खळबळ

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group