• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दर्यापूरमध्ये राडा, नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या, सभेत मोठा गोंधळ

Admin by Admin
November 17, 2024
in राजकीय
1 min read
0
दर्यापूरमध्ये राडा, नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या, सभेत मोठा गोंधळ
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

माजी खासदार नवनीत राणा यांच्या सभेदरम्यान जोरदार गोंधळ झाला आहे. दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील खल्लार गावात नवनीत राणा यांच्या प्रचार सभेदरम्यान मोठा राडा झालाय.

काही लोकांनी माजी खासदार नवनीत राना यांच्या अंगावर खुर्च्या फेकल्याचं समोर झालेय. नवनीत राणा रमेश बुंदीले यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या, त्यावेळी जमावाने घोषणाबाजी करत गोंधळ घातला. खुर्च्या फेकल्या. दोन गटामध्ये हाणामारी, धक्काबुक्की आणि राडा झाल्याचे माहिती समोर मिळाली.

शनिवारी रात्री नवनीत राणा दर्यापूर मतदारसंघात प्रचारासाठी आल्या होत्या. खल्लार या गावात युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारासाठी नवनीन राणा यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोठा गोंधळ झाला. यावेळी दोन गटाचे कार्यकर्ते भिडले. जमाव आक्रमक झाल्यानंतर पोलिसांना पाचरण करण्यात आले. पोलिसांनी हे प्रकरण शांत केले. पण यामध्ये अनेकजण जखमी झाल्याचे समजतेय. खुर्च्या फेकून मारल्या. तोडफोड करण्यात आली. दोन गटात जोरदार घोषणाबाजी आणि मारमारी झाल्याचं समोर आलेय. खल्लार गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

दोन गटात राडा झाला. नवनीत राणा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी झाल्याचे समोर आलेय. या प्रकारानंतर नवनीत राणा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पोलिसांत धाव घेतली. या घटनेचा व्हिडीओ पोलिसांना दाखवत नवनीत राणा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांकडून याप्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

  • दर्यापूरमध्ये नेमकं काय झालं?

अमरावतीमधील दर्यापूर मतदारसंघातील खल्लार गावात माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोठा गोंधळ झाला. युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांना पाठिंबा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात काही जणांनी नवनीत राणा यांच्यावर खुर्च्या फेकल्याने गोंधळ उडाला. या घटनेत नवनीत राणा थोडक्यात बचावल्याचं समजतेय. राड्यानंतर नवनीत राणा यांनी खल्लार पोलीस ठाणे गाठले.

या घटनेने रॅलीतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याशिवाय दर्यापूर येथील राजकीय वातावरणात तणाव वाढला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.

Previous Post

मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यातील कठड्यांमुळे दैनंदिन अपघात, प्रशासन – राज्यकर्त्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष..?

Next Post

सावधान हे वाचा.. सांगलीत आक्षेपार्ह मजकूरप्रकरणी व्हाट्सऍप ग्रुप अ‍ॅडमीनवर गुन्हा दाखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

सावधान हे वाचा.. सांगलीत आक्षेपार्ह मजकूरप्रकरणी व्हाट्सऍप ग्रुप अ‍ॅडमीनवर गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group