मिरज प्रतिनिधी – गोपनीय खबऱ्या ऑनलाईन | विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आता अंतिम टप्प्यावर आलाय. या अंतिम टप्प्यात राजकीय नेत्यांना सभांचा धडाका लावलाय. त्याचवेळी निवडणूक आयोग सुद्धा अॅक्शन मोडवर आले आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रचाराला जाणाऱ्या नेत्यांच्या बॅगा तपासण्याचा धडाका लावलाय.
भाजपच्या स्टार प्रचारक पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरची देखील तपासणी करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील मिरज मतदार संघातील बेडग गावामध्ये भाजप आमदार सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेसाठी त्या हेलिकॉप्टरने दाखल झाल्या. यावेळी निवडणूक आयोग पथकाकडून पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची देखील तपासणी करण्यात आली आहे. पंकजा मुंडे या सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग येथे हेलिकॉप्टरने आल्या होत्या.

