• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

तासवडे टोल नाक्यावर मोठी कारवाई; पोलिसांच्या विशेष पथकास सापडली 15 लाखांची रक्कम

Admin by Admin
October 26, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ठीक ठिकाणी स्थिर पथकांद्वारे वाहनांची तपासणी केली जात आहे. वाहनांच्या तपासणी दरम्यान पोलिसांना मोठ्या प्रमाणात रक्कम देखील आढळत आहे. दरम्यान, कराड तालुक्यातील पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोल नाक्याजवळ तळबीड पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या विशेष पथकस वाहन तपासणीवेळी 15 लाखांची रोख रक्कम आढळून आल्याची घटना मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली. संबंधित रक्कम व वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबबात अधिक माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोल नाक्यावर तळबीड पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री बारा वाजल्यानंतर पोलिसांकडून वाहनाची तपासणी करतेवेळी मध्यरात्री अडीच वाजता कराडहून साताऱ्याकडे जाणारी महिंद्रा बोलेरो (वाहन क्रमांक GJ 27 EE 8738) संशयास्पद स्थितीत आढळून आले. यावेळी पोलीसानी मध्यरात्री अडीच वाजता वाहन थांबवून तपासणी केली.

यावेळी वाहनाच्या तपासणी दरम्यान वाहनामध्ये पोलिसांना 15 लाख रुपयांची रोख रक्कम आढळली. सदर वाहन व रोख रक्कम तात्काळ तळबीड पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सुरक्षित ठेवण्यात आली. घटनेचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला असून पुढील तपासासाठी वाहन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सदर रक्कम कुठून आली व ती कोणाकडे जाणार होती, याचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Previous Post

विधानसभेतही 5 ठिकाणी सांगली पॅटर्न राबवण्याची काँग्रेसची तयारी : लोकसभेला सांगलीत उद्धवसेनेविरुद्ध होता काँग्रेसचा बंडखोर

Next Post

ब्रेकिंग | काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर :औरंगाबाद पूर्वमधून देशमुख, शिरोळमधून गणपतराव पाटील,जालन्यातून गोरंट्याल, सावनेरमधून अनुजा केदार यांना संधी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर :औरंगाबाद पूर्वमधून देशमुख, शिरोळमधून गणपतराव पाटील,जालन्यातून गोरंट्याल, सावनेरमधून अनुजा केदार यांना संधी

ब्रेकिंग | काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर :औरंगाबाद पूर्वमधून देशमुख, शिरोळमधून गणपतराव पाटील,जालन्यातून गोरंट्याल, सावनेरमधून अनुजा केदार यांना संधी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group