• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

‘या’ दोघांना जिल्हा पोलीस अधीक्षकांचा मोठा दणका..!

Admin by Admin
August 29, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
वाहनचालकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी कर्मचाऱ्याचे निलंबन..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  • सख्ख्या भावांना केले पोलिस दलातून सेवामुक्त

जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे विभागीय चौकशी अहवालानंतर दोघा सख्ख्या भावांना पोलिस दलातील सेवेतून मुक्त केले.

पोलिस उपनिरीक्षक महेश रमेश शिंदे आणि पोलिस नाईक विष्णू रमेश शिंदे अशी त्यांची नावे आहेत. याचे आदेश पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी काढले.

पोलिसांनी सांगितले, की उपनिरीक्षक महेश शिंदे हे सप्टेंबर १९९१ ला, तर विष्णू शिंदे हे ऑगस्ट २००४ ला भटक्या जमाती ‘ब’ वर्गातून भरती झाले होते. भरती वेळी त्यांनी जात प्रमाणपत्र सादर केले होते. त्याआधारे त्यांना आरक्षणातून नोकरी मिळाली होती. मात्र, त्यानंतर उच्च न्यायालयाने सेवेतील सर्वांची जात पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर वारंवार माहिती देऊनही दोघांनीही जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही.

त्यानंतरही त्यांची सेवा सुरूच होती. विष्णू सध्या पोलिस मुख्यालयात तर महेश राधानगरी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल आहे.

दरम्यान, पोलिस अधीक्षकांकडून दोघांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत विभागीय चौकशी नेमली. कोल्हापूर आणि गडहिंग्लज येथील अपर पोलिस अधीक्षकांनी याची चौकशी पूर्ण केली. त्यांनी दिलेल्या अहवालानंतर दोघांनाही सेवेतून मुक्त केले. त्यांनी वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे ही कारवाई केल्याची माहिती अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.

Previous Post

प्रेम संबंधातून खून, आधारकार्डमुळे दुसरा संशयितही ताब्यात..!

Next Post

मिरजेत भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

मिरजेत भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group